स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, घरफोडी प्रकरणात एका विधीसंघर्ष इसमाला अटक, मुद्देमाल जप्त (Local Crime Branch action, a disabled man arrested in a house burglary case, valuables seized)
चंद्रपूर :- १७ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पथक शहर हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, मुखबिराकडून माहिती मिळाली की एक इसम बिनबा गेट, शांतीधाम परिसरात संशयास्पदरीत्या फिरत आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन संशयित इसमास ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेने एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन एका घरफोडी प्रकरणाचा उलगडा केले आहे. त्यात बालका कडून १ लाखांचा दोन सोन्याचे अंगठी जप्त केले. त्याबाबत चौकशी केली असता, बालकाने घुटकाला वार्ड, चंद्रपूर येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. पुढील चौकशीत सदर बालकाकडून चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गु. र. नं. ७५४ / २५ कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४) भा.दं.सं. अंतर्गत दाखल घरफोडी प्रकरणातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा मुद्देमाल बालकाच्या वडिलांच्या व पंचांच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आला. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोहवा नितीन साळवे, पोअं नितीन कुरेकार, अमोल सावे, चापोहवा गजानन मडावी यांनी केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे घरफोडी प्रकरणाचा उलगडा झाला असून, जप्त मुद्देमाल व बालक पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे चंद्रपूर शहर यांच्या ताब्यात देण्यात आले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या