बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बल्लारपूर द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सायबर सुरक्षा या विषयावर कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. पंकज कावरे तसेच राष्ट्रीय सेवा योजना चे सह कार्यक्रमाधिकारी प्रा. शुभांगी भेंडे शर्मा उपस्थित होत्या . प्रमुख अतिथी आयटी ट्रेनर प्रतीक डबली तसेच सॉफ्ट स्किल ट्रेनर मोहित सूर्यवंशी उपस्थित होते . एन आय आय टी फाउंडेशन नवी दिल्ली चे मार्गदर्शक प्रतीक डब्ल्यू आणि मोहित सूर्यवंशी यांनी आज ए आय च्या माध्यमातून कशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक होत आहे तसेच सोशल मीडियावर बहुतांश लोक ऍक्टिव्ह असतात आणि बळी कसे पडतात याविषयी मार्गदर्शन केले.
ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर घरी आपण उरलेला डबा फेकून देतो त्यामध्ये क्यू आर कोड असतो , आपला जी मेल आयडी असतो तसेच मोबाईल नंबर असते आणि इतरही माहिती असते ज्यामुळे भविष्यात आपल्याला धोका उद्भव उद्भवण्याची शक्यता असते. आधार कार्ड झेरॉक्स आपण एखाद्याला देतो तर त्या आधार कार्डवर कशासाठी तिथेच लिहिणे आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे इंग्रजी माध्यमाचे पर्यवेक्षक कृष्णा लाभे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन बीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी याचना जवंजाळ तिने केले व आभार प्रदर्शन सुप्रिया माऊली कर या बीए प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या