स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तीन घरफोडी प्रकरणाचा छडा, दोन आरोपी अटकेत (Local Crime Branch action, three burglary cases solved, two accused arrested)
चंद्रपूर :- १६ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक रामनगर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एका इसमाबाबत माहिती मिळाली की, तो चोरीचा मुद्देमाल सोनाराकडे विकण्यासाठी निमवाटिका, रयतवारी कॉलरी परिसरात येणार आहे. स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरने गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत दोन घरफोडी आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा एकूण ८६,२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. रामण्णा दशरथ दांडेकर (२९), रा. राजीव गांधी वॉर्ड, वरोरा, अरुण लिलाधर साहा (३२), मूळ सीतामढी, बिहार, हल्ली मुक्काम अष्टभुजा वार्ड, चंद्रपूर असे अटकेतील आरोपींचे नाव असून अरविंद सातपुते, रा. वरोरा, अर्जुन दांडेकर, रा. ब्रम्हपुरी हे फरार आरोपी आहे. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी वरोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अंगझडतीदरम्यान सोन्या-चांदीचे दागिने व नगदी असा ८६ हजार २७० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. चौकशीत आरोपीने वरोरा व भद्रावती येथील घरफोडी गुन्ह्यांची कबुली दिली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोहवा नितीन साळवे, नितीन कुरेकार, प्रमोद कोटनाके, चापोहवा गजानन मडावी, पो. अमोल सावे व प्रसाद धुळगंडे यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या