स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला तीन तलवार सहित अटक (Local Crime Branch action: Terrorist accused arrested with three swords)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला तीन तलवार सहित अटक (Local Crime Branch action: Terrorist accused arrested with three swords)

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली कि वडगाव ते आंबेडकर सभागृह दरम्यान लोकांमध्ये तलवार घेऊन दहशत निर्माण करत आहे. अश्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी धीरज बबलू यादव (३२) रा. लखमापूर यास ताब्यात घेतले. लोकांमध्ये तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले असून त्याच्या कडून तीन तलवार जप्त केले आहे. धीरज बबलू यादव (३२) रा.लखमापूर ता. जि चंद्रपूर असे आरोपीचे नाव असून राहुल नामक आरोपी फरार आहे. तपासात आरोपीकडून एकूण तीन स्टीलच्या धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या, ज्यांची किंमत अंदाजे तीन हजार रुपये आहे. या प्रकरणी धीरज बबलू यादव तसेच दुसरा आरोपी राहुल रहिवासी लखमापूर) यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा, कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष निभोरकर, सर्वेश बेलसरे, पोहवा जय सिंह, सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, दिनेश अराडे यांनी केले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)