बल्लारपूर :- दिनांक 2 आक्टोम्बर 2025 ला अशोका धम्म विजयादशमी दिनी भारतीय संविधान,सन्मान सुरक्षा आणि संवर्धन (बीएस 4) अभियान अंतर्गत नागपूर येथे पथसंचलन व गणसभेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 4:00 वाजता संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पथसंचलन सुरु होणार असून समारोप संविधान मैदान (इंदोरा मैदान ) इंदोरा, नागपूर येथे होणार आहे. पथ संचलनानंतर सायंकाळी 6:00 वाजता गणसभेला सुरुवात होईल.या गण सभेला मुख्य अतिथी शीतल मरकाम (गोंडवाना मुक्ती सेना, नागपूर), विशेष अतिथी डॉ.के.एस. चौहान (वरिष्ठ अधिवक्ता, सुप्रीम कोर्ट, दिल्ली), प्रा.डॉ.विकास जांभुळकर (फुले - आंबेडकरवादी विचारवंत,नागपूर) मान्यवर वक्ते "राष्ट्रीयकरणाकडून राज्य समाजवादापर्यंत" या विषयावर मार्गदर्शन करतील. सदर गण सभेची अध्यक्षता बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. आर. एल. ध्रुव करतील. राष्ट्रीय संविधान पथ संचलन ही एक व्यापक जनसंपर्क मोहीम आहे आणि सार्वजनिक संवादाचे माध्यम आहे. तशीच ती जनचळवळीच्या वाढत्या प्रभावाची वार्षिक घोषणा सुद्धा आहे. ही प्रगतीशील सभ्यता आणि कलेचा एक नवीन आयाम आहे. अशोक धम्म विजयादशमीच्या निमित्ताने, लोकशाहीच्या वारशाचा आणि प्रगतीच्या नवीन आणि प्रगत मार्गांचा स्पष्ट संदेश येथून राष्ट्राला दिला जाईल आणि कळवला जाईल.
या वर्षी, बीएस-४ अभियान कार्यक्रमांतर्गत, देशभरातील १,००० निवडक संविधान प्रबोधक उपस्थित राहतील. तसेच बीएस 4 अभियान अंतर्गत "राष्ट्रीयीकरणाचा अजेंडा" घेऊन नागपूरच्या ऐतिहासिक "संविधान चौक" पासून इंदोरा मैदान (संविधान मैदान) पर्यंत त्यांच्या संघटित आणि शिस्तबद्ध मोर्चाचे नेतृत्व करतील. या कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट सामान्य जनतेपर्यंत या विषयाची व्याप्ती, महत्त्व आणि प्रासंगिकता पोहोचवणे आहे. म्हणून, सामाजिक क्रांतीच्या या चळवळीत भारतीय नागरिकांनी पथ संचलनात व गण सभेत सक्रिय सहभाग घ्यावा, अशी विनंती वनिता सुटे-भसारकर, जिल्हाध्यक्षा, बामसेफ, चंद्रपूर देवानंद रायपुरे महासचिव, बामसेफ जि.चंद्रपूर, सेवकदास बरके, मूलनिवासी संघ, नभा विघमारे अध्यक्षा, महीला विंग्ज, महेंद्र खंडाळे, जिल्हाध्यक्ष पावर विंग्ज, संदीप वाघमारे, पिंपल्स युवा फ्रंट,महेंद्र सोरते, मूलनिवासी सभ्यता संघ, मोतीराम करमनकर, मक्कम, इत्यादींनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या