राज्य निवडणूक आयोगाचे संकेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डिसेंबर - जानेवारी मध्ये होण्याची शक्यता...? (State Election Commission hints that local body elections are likely to be held in December-January...?)
वृत्तसेवा :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना आता याबाबत निवडणूक आयोगाने मोठी अपडेट दिली आहे. या माहितीनुसार स्थानिक स्वराज्या स्थंस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्याने होणार असून, डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान पालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. नाशिकमध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे अधिकारी, कर्मचारी व तांत्रिक यंत्रणा यांचा आढावा देखील बैठकीत घेण्यात आला. प्रारूप प्रभाग रचना निश्चित झाल्यावर पुढील प्रक्रिया राबवली जाणार असून, 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार यादीच्या आधारे निवडणूक घेण्यात येणार आहे.
डिसेंबर ते जानेवारी दरम्यान पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य स्थंस्थांच्या निवडणुकांमध्ये VV-PAT यंत्रे वापरण्यात येणार नाहीत, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले. डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात निवडणुका सुरू राहतील असेही संकेत वाघमारे यांनी दिले आहेत. अ, ब आणि क वर्ग महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी झाले आहेत. त्यानुसार 'अ' वर्ग महानगरपालिकेत पुणे, नागपूर, 'ब' वर्ग महानगरपालिकेत ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड तर, 'क' वर्ग महानगरपालिकांमध्ये नवीमुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजी नगर , कल्याण-डोंबिवली महापालिकांचा समावेश आहे. SC-ST आरक्षण निश्चित असते, परंतु OBC आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार असल्याचेही वाघामारे यांनी यावेळी स्पष्ट केले. मागील निवडणुकांमध्येही OBC आरक्षण होते आणि यावेळीही तेच तत्त्व पाळले जाणार असल्याचेही वाघामारे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत माहिती देताना सांगितले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या