बल्लारपूरात बामसेफ आणि ऑफशुट विंग्ज यांनी केले मंडल यात्रेचे स्वागत (Bamsafe and Offshoot Wings welcomed the Mandal Yatra in Ballarpur)
बल्लारपूर :- जातिनिहाय जनगणना आणि विविध मागण्यांच्या संदर्भात बहुजन समाजातील लोकांना जागृत करण्यासाठी नागपूर वरून "मंडल दिवसा निमित्त" निघालेल्या "मंडल यात्रेचे" दि. 4/8/25 ला बल्लारपूर येथील नगर परिषद जवळ बामसेफ आणि ऑफशुट विंग्ज च्या वतीने करण्यात आले.भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मालार्पन यात्रेचे संयोजक मा.उमेश कोरम जेएनयु, यांच्या हस्ते संपन्न झाले. बामसेफ आणि ऑफशुट विंग्ज व अन्य संघटनांच्या वतीने कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. मा.एम.टी.साव सर, माजी राज्य अध्यक्ष बामसेफ, व माजी राष्ट्रीय संघटण सचिव, मूलनिवासी संघ, मा. जि.के.उपरे, राज्य उपाध्यक्ष पीपल्स पार्टी ऑफ इंडिया-डी, तथा माजी मानद सचिव सिडीसिसी बॅंक, मा.कमलाकर कायरकर जिल्हा उपाध्यक्ष पीपीआय-डी, मा. महेंद्र सोरते, राज्य कार्यकारिणी सदस्य मूलनिवासी सभ्यता संघ, अरूण बहादे, विसापूर इ.नी मंडल यात्रेचे स्वागत केले. यात्रेचे संयोजक मा.उमेश कोरम, भंडारा, चंद्रपूर ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मा.प्रा.अनिल डहाके, चंद्रपूर चे निमंत्रक मा.एड्.विलास माथनकर, मा.नवनाथ देवकर, मा.मुन्ना आवळे, इ.चे स्वागत बामसेफ आणि ऑफशुट विंग्ज च्या वतीने केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या