चंद्रपूरच्या दिक्षाभूमीवर प्रा. रवि कांबळे लिखित' धम्मदर्शन' या ग्रंथाचे प्रकाशन (Publication of the book 'Dhammadarshan' written by Prof. Ravi Kamble at Chandrapur's Dikshabhoomi)
चंद्रपूर : तथागत भगवान बुद्धांनी वेगवेगळ्या ठिकाणी श्रावकांना केलेल्या लोक कल्याणकारी उपदेशावर आधारित मनुष्याच्या कल्याण करिता वेगवेगळ्या विषयाची 'धम्मदर्शन' या ग्रंथात मांडणी केली आहे. प्रा. रवि कांबळे लिखित' धम्मदर्शन' या ग्रंथाचे प्रकाशन दिनांक ९ ऑगस्ट २०२५ ला सकाळी ११ वाजता चंद्रपूर
दीक्षाभूमि येथील बुद्ध विहारात होणार आहे. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर राहणार आहेत. या ग्रंथावर भदंत श्रद्धारक्षित, चंद्रपूर भाष्य करणार आहेत. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती भिक्षुणी खेमा, बल्लारपूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चे उपाध्यक्ष अशोक घोटेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूरचे सचिव वामनराव मोडक, डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर चे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर उपस्थित राहणार आहेत. ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला चंद्रपूर शहरातील बौद्ध बांधवानी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रा. डॉ. विजया कांबळे यांनी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या