चंद्रपूर महानगराची कार्यकारिणी जाहीर, वंचितच्या जिल्हाध्यक्षपदी स्नेहल रामटेके यांची निवड (Chandrapur Metropolitan City Executive Committee announced, Snehal Ramteke elected as Vanchit District President)
चंद्रपूर :- वंचित बहुजन आघाडीच्या चंद्रपूर महानगर अध्यक्षपदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली होती. मात्र, पक्षाचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी माजी नगरसेवक स्नेहल देवआनंद रामटेके यांच्यावर विश्वास दर्शविला आहे. पक्षाचे प्रदेश महासचिव किसन चव्हाण यांनी ६ ऑगस्ट रोजी चंद्रपूर महानगराची कार्यकारिणी जाहीर केली आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या रामटेके यांच्यामुळे पक्षाला बळकटी मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वंचितने पक्षात मोठे फेरबदल केले आहेत. या कार्यकारिणीत उपाध्यक्ष डॉ. प्रज्ञाशील सहारे, हरीश इंदूरकर, लहू मरसकोल्हे, संघपाल सरकटे, रवी रेड्डी, महासचिव प्रज्ञाशील साखरे, संघटक शंकर चापडे, प्रवीण वाळके, एड. विपीन रामटेके, सुरेश दुधगवळी, सहसचिव सुभाषचंद्र ढोलने, संदीप देव, अरविंद भसारकर, कोषाध्यक्ष मिथुन कातकर, विधी सल्लागार एड. पूनमचंद वाकडे, प्रसिद्धीप्रमुख सुमीत वाकडे, सल्लागार प्रेमदास मेश्राम, तर सदस्य म्हणून हरिंद्र चुनारकर, बंडू निमगडे, राजी कीर्तक यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी विश्वास दर्शवून अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळावे, यासाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास नवनियुक्त अध्यक्ष स्नेहल रामटेके यांनी व्यक्त केला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या