छत्रपती संभाजीनगर, दि.१ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम झाला.
विद्यार्थी विकास विभाग व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र यांच्यावतीने मुख्य इमारतीत शुक्रवारी दि.एक सकाळी ११ वाजता मुख्य इमारतीत हा कार्यक्रम झाला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या ’फकिरा’ या प्रसिध्द कादंबरीचा हिंदी अनुदवाद प्रा.वेदकुमार वेदालंकार यांनी केले आहे. २२८ पानांचे हे पुस्तक आहे. यावेळी कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, आधिष्ठाता डॉ.वैशाली खापर्डे, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे, डॉ.सोनाली क्षीरसागर, अध्यासन संचालक डॉ.वैशाली बोदेले, डॉ.संजय कवडे, रविंद्र काळे, डॉ.मुस्तजिब खान, डॉ.नंदिता पाटील, डॉ.एस.जी.शिंदे आदींची उपस्थिती होती. साहित्यरत्न ’अण्णाभाऊ साठे’ यांच्या ’फकिरा’ कादंबरीचा अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या