मृत्यू नंतरही नेत्रदानामुळे प्रतिक्षा पाहणार अवघ जग (Even after death, the whole world will wait for eye donation.)

Vidyanshnewslive
By -
0
मृत्यू नंतरही नेत्रदानामुळे प्रतिक्षा पाहणार अवघ जग (Even after death, the whole world will wait for eye donation.)


चंद्रपूर :- जीवनाचं अंतिम सत्य म्हणजे मृत्यू पण हा कधी केव्हा व कोणत्या मार्गाने येईल हे कुणालाच सांगता येत नाही पण मृत्यूने माणसाला कवटाळल्या नंतर अवयव दानाच्या स्वरूपात अवघ विश्व अनुभवता येतंय नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील कैवल्य या 10 वर्षाच्या चिमुकल्याने आपल्या मृत्यू नंतर 4 अवयव दान करून 4 जणांना जीवनदान दिले आहे. असाच प्रकार चंद्रपूर येथील प्रतिक्षा गेशेंद्र रामटेके या 29 वर्ष रा. विकास नगर, बाबुपेठ वार्ड चंद्रपूर या तरुणीबाबत घडला. प्रतिक्षा ही एका गंभीर आजाराने ग्रस्त असतांना तिच्यावर नागपुरात एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना उपचारादरम्यान काल रात्रीच्या सुमारास निधन झाले पण प्रतिक्षा स्वतः वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे तिच्या निधनामुळं अवयव दानाचा विचार कुटुंबियांनी केला. व मृत्यू पश्चात नेत्रदान करून एका व्यक्तीला जीवनदान देण्याचा प्रयत्न केला. आज प्रतिक्षा यांच्या मृतदेहावर बाबुपेठ स्मशानभूमीत साश्रूनयनानी अंत्यसंस्कार करण्यात आला.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)