बल्लारपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार मंगल जीवने कर्मवीर पुरस्काराने सन्मानित (Senior journalist Mangal Jeeve of Ballarpur city honored with Karmaveer Award)

Vidyanshnewslive
By -
0
बल्लारपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार मंगल जीवने कर्मवीर पुरस्काराने सन्मानित (Senior journalist Mangal Jeeve of Ballarpur city honored with Karmaveer Award)

चंद्रपूर :- लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार मंगल जीवने यांना पत्रकारिता, सामाजिक कार्य, प्रशासन व ग्रामीण सेवेमध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने 'कर्मवीर पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. १ ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथील सभागृहात झालेल्या भव्य समारंभात त्यांना हा पुरस्कार सपत्नीक शाल, मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग होते. प्रमुख उपस्थितीमध्ये दै. नवराष्ट्र चे वृत्तसंपादक प्रा. डॉ. गणेश खवसे आणि सिडीसीसी बँक चे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादनाने झाली. सत्कार सोहळ्यात पुलकित सिंग व प्रा. डॉ. खवसे यांच्या हस्ते मंगल जीवने यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सत्कारमूर्तींसह उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले. संचालन शाम हेडाऊ यांनी तर आभार प्रदर्शन प्रविण बतकी यांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)