बल्लारपूरात आणखी एक तलवार जप्त, बल्लारपूर पोलिसांची कारवाई (Another sword seized in Ballarpur, Ballarpur police take action)
बल्लारपूर :- पोलीस ठाणे बल्लारपूर यांची उल्लेखनिय कामगीरी अशी आहे की, दिनांक - ०२/०८/२०२५ रोजी बल्लारपुर पोलीस ठाणे हद्दीमध्ये खाजगी वाहनाने पेट्रेलींग करीत असताना बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, विद्यानगर वार्ड बल्लारपूर येथील राहणारा इसम नामे सत्वशील कांबळे हा लोंकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने आपले राहते घरी अवैध रित्या तलवार बाळगुन आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून माहीतीची शहानिशा करणे कामी विद्यानगर वार्ड, बल्लारपूर येथील सत्वशील कांबळे याचे घरी रेड करून झडती घेतली असता एक लोखंडी तलवार मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष तलवार जप्त करून सदर इसम नामे सत्वशील शैलेश कांबळे वय १९ वर्षे रा. विद्यानगर वार्ड, बल्लारपूर याचे विरूध्द भा.ह.का. अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. मा. अपर पो. अधिक्षक ईश्वर कातकडे, श्री. सुधाकर यादव सा. उपविभागिय पो अधिकारी, राजूरा/चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पो. निरिक्षक बिपीन इंगळे, सपोनि मदन दिवटे, सपोनि शब्बीर पठाण सफौ. रणविजय ठाकुर, आनंद परचाके, पोहवा. सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, सुनिल कामतकर, पो. अंमलदार शरदचंद्र कारूप, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, विकास जुमनाके, सचिन अलेवार, भास्कर चिचवलकर, सचिन राठोड, म.पो. अंमलदार अनिता नायडू इत्यादी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या