धाराशिव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे जीवनसाधना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. विद्यापीठ धाराशिव उपपरिसर वर्धापनदिनी १६; ऑगस्ट रोजी पुरस्कार प्रदान करणार विद्यापीठ धाराशिव उपपरिसरचा पुरस्कार प्रख्यात ग्रामीण कथाकार प्रा.भास्कर चंदनशिव यांना वर्धापनदिनी प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी दिली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांना दरवर्षी वर्धापनदिनी जीवनसाधना पुरस्काराने गौरविण्यात येते. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी यंदाची पुरस्कार शोध समिती स्थापन केली. सदर प्रक्रिया अत्यंत गोपनीय व पारदर्शक रितीने राबविण्यात आली . या समितीने ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ, कृषीरत्न विजयअण्णा बोराडे यांची जीवनसाधना पुरस्कारासाठी शिफारस केली. विद्यापीठाच्या ६७ व्या वर्धापनदिनी ’एसएनडीटी’ महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते येत्या २३ ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.कृषी, तर तर धाराशिव उपपरिसरच्या २१ व्या वर्धापनदिनी येत्या १६ ऑगस्ट रोजी प्रख्यात ग्रामीण कथाकार प्रा.भास्कर चंदनशीव यांना धाराशिव येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिक्षण, लेखन , साहित्य आदी क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे प्रमुख अतिथी म्हणून मुंबई येथील होमी भाभा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी हे राहणार आहेत. तर प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य बसवराज मंगरुळे, डॉ अंकुश कदम यांची प्रमुख उपस्थिती यावेळी राहील. धाराशिव येथील कार्यक्रमानंतर व्यवस्थापन परिषदेची बैठक घेण्यात येईल. तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चार अनुवादीत ग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात येईल. अण्णाभाऊ साठे यांच्या निवडक कथा, वारणेचा वाघ, फकिरा, वारणा नदीच्या खो-यात या चार मराठी पुस्तकांचा प्रा.वेदकुमार वेदालंकार यांनी हिंदी अनुवाद केला आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या