बल्लारपूर : बल्लारपूर येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या नॅशनल कॅडेट कॉर्प विभाग आणि रेड रिबन क्लबच्या वतीने पोस्टर स्पर्धा, रील मेकिंग स्पर्धा, आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जनजागृती रॅली, एड्स जागरूकता मोहीम, हर घर तिरंगा मोहीम आणि उत्तीर्ण कॅडेट्सना सी प्रमाणपत्र वितरणाचे आयोजन करण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी राष्ट्रीय कॅडेट कॉर्पकडून हर घर अभियान राबविले जात आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सतीश कर्णासे, ग्रंथालय प्रमुख डॉ. पंकज कावरे आणि सन्माननीय अतिथी श्री. निरंजन मगरुळकर जिल्हा पर्यवेक्षक आयसीटीसी, एनजीओ चे श्री. रोशन आकुलवार, ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथील श्रीमती स्मिता काकडे उपस्थित होते. युवा दिनानिमित्त लेफ्टनंट योगेश टेकाडे असोसिएट एनसीसी अधिकारी विद्यार्थ्यांना शपथ दिली. त्यानंतर, प्रत्येक घरात आंतरराष्ट्रीय युवा दिन आणि तिरंगा जागरूकता मोहीम आयोजित करण्यात आली. प्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थी सहभागी झाले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सार्जंट गायत्री पामडी यांनी केले आणि आभार कार्पोरेल पूजा मडावी यांनी मानले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या