(बि. ई. एफ.)बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियाचे विभागीय अधिवेशन संपन्न (B. E. F.) Bahujan Employees Federation of India's divisional convention concluded)
वर्धा :- स्मृतिशेष श्रीकृष्ण उबाळे साहेब यांच्या स्मृतिदिना निमित्य वर्धा येथे बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया चे विभागीय अधिवेशन संपन्न झाले. हे अधिवेशन दोन सत्रात पार पडले. अधिवेशनाची सुरवात महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार तथा बि. ई. एफ.चे संस्थापक स्मृतिशेष श्रीकृष्ण उबाळे साहेब यांना अभिवादन करून करण्यात आली. अँड चंद्रशेखर देवतळे राष्ट्रीय मार्गदर्शक बि. ई. एफ.यांनी अधिवेशनाचे उदघाटन केले. स्वागताध्यक्ष शैलेश वासनिक, सहाय्यक निबंधक, वर्ग 2 हिंगणघाट हे होते. प्रथम सत्राचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. प्रा. शेषराव रोकडें हे होते. या सत्रात नांदेड ज़िल्हाध्यक्ष अरविंद गवळे, अकोला ज़िल्हा उपाध्यक्ष सुधाकर वासे, चंद्रपूर ज़िल्हाध्यक्ष संजय खोब्रागडे, हिंगोली ज़िल्हा संयोजक वसंत सावंत, नागपूर ज़िल्हाध्यक्ष सुजय वानखेडे, वर्धा ज़िल्हा सचिव अजय घंगारे, मुंबई विभागाचे संजय मोहिले, मराठवाडा विभागाचे इंजि.अनंत खोब्रागडे, अमरावतीचे कैलास सोनोने, यवतमाळचे महादेव अर्जुन, चेतन ढोले इत्यादीनी आपल्या ज़िल्हाचा अहवाल सादर केला. राष्ट्रीय मार्गदर्शक आदरणीय निर्मलाताई उबाळे , राष्ट्रीय महासचिव पि. एच. गवई, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. चरणदास सोळंके, राज्य सचिव नरेश मूर्ती, महाराष्ट्र उपाध्यक्ष चैनदास भालाधरे सहसचिव शिवदास कांबळे, ए. आर. पि. प्रदेशाध्यक्ष मोहम्मद शफी सौदागर अमरावती, इत्यादीनी मार्गदर्शन केले. मंचावर पत्रकार गंगाधर नाखले पत्रकार अमरावती हे उपस्थित होते.या सत्राचे प्रास्ताविक आणि ठरावांचे वाचन राज्य सचिव सिद्धार्थ सुमन तर वार्षिक जमाखर्च राज्य कोषाध्यक्ष अशोक ठवळे यांनी सादर केला. संचालन संघटन सचिव सिद्धार्थ डोईफोडे तर आभार प्रदर्शन वर्धा ज़िल्हाध्यक्ष कमलेश कामडी यांनी केले.
दुसरे सत्र राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे यांच्या अध्यक्षते खाली पार पडले. " वर्तमान परिस्थितीत सामाजिक लोकशाहीचे भवितव्य " या विषयावर संविधानाचे अभ्यासक प्रा. देविदास घोडेस्वार, नागपूर, अरविंद सोनटक्के, राष्ट्रीय सल्लागार बि. ई. एफ. तथा प्रा. डॉ. सुभाष खंडारे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. सत्राचे प्रास्ताविक वसंतराव मुरारकर, संचालन महाराष्ट्र महासचिव प्रा. डॉ. रविकांत महिंदकर तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र कोषाध्यक्ष अशोक ठवळे यांनी केले. अधिवेशन यशस्वी करण्याकरिता सिद्धार्थ डोईफोडे यांच्या नेतृत्वात कमलेश कामडी, संजय हाडके, गजानन गायकवाड, अजयकुमार घंगारे, प्रमोद राऊत, कुणाल देठे, प्रमोद नगराळे, अशोक रामटेके, वसंतराव मुरारकर, अमोल मानकर, मयूर कांबळे, आणि निताताई गणवीर यांनी परिश्रम केले.असे राज्य सचिव सिद्धार्थ सुमन या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवित आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या