दीक्षाभूमी चौक सौंदर्यीकरणासाठी मनपा आयुक्तांना मागणी (Demand to Municipal Commissioner for beautification of Deekshabhoomi Chowk)

Vidyanshnewslive
By -
0
दीक्षाभूमी चौक सौंदर्यीकरणासाठी मनपा आयुक्तांना मागणी (Demand to Municipal Commissioner for beautification of Deekshabhoomi Chowk)

चंद्रपूर : दीक्षाभूमीलगत असलेल्या दीक्षाभूमी चौकाचे सौंदर्यीकरणासाठी करण्यात यावे, अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या महिला सेलतर्फे मनपा आयुक्तांना बुधवारी निवेदनातून केली. १६ ऑक्टोबर १९५६ रोजी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या विनंतीला मान देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा चंद्रपुरात दिली. तेव्हापासून चंद्रपूर येथील दीक्षाभूमीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. दरवर्षी बौद्ध-आंबेडकरी अनुयायी त्यांना वंदन करण्यासाठी दीक्षाभूमीला येतात. या दीक्षाभूमीला लागून असलेल्या जुना वरोरा नाका चौकाचे नामकरण चंद्रपूर शहर महानगरपालिकेने करून दीक्षाभूमी चौक असे करत नामफलक लावले. परंतु काळाच्या पडद्यावर दीक्षाभूमी चौक अस्तित्वात आहे. याचा विसर अनेकांना पडला आणि सामान्य लोकसुध्दा अनभिज्ञ आहेत. याच चौकाचे सौंदर्याकरण एलइडी लाईट लावावे, अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात मनपा आयुक्तांना महिला आघाडीतर्फे देण्यात आले. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा मृणाल कांबळे, प्रेरणा करमरकर, छाया थोरात, गीता रामटेके, निर्मला नगराळे, पंचफुला वेल्हेकर, वैशाली साठे, ज्योती शिवणकर, अश्विनी आवळे, पौर्णिमा जुलमे, प्रतिभा वाघमारे, शीला कोवले, समता खोब्रागडे, पौर्णिमा गोंगले, प्रज्योत बोरकर, हर्षल खोब्रागडे आदी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)