बल्लारपूर :- ठाणेदार, दरोगा असे शब्द समोर आले की, एक वेगळीच प्रतिभा समोर येते, जाड जुड शरीरर्यंष्टी, क्रूर, भारदार डोळे, कुठलीही दया माया नसणारा.. पण नुकतेच बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार म्हणून रजू झालेले विपीन इंगळे हे व्यक्तिमत्व वेगळेच आहे. बोलतांना त्यांच्यात कुठलीही क्रूरता नाही. डोळ्यात कारून्य.. साधा सरळ स्वभावाचा खजिना असलेला तरुण ठाणेदार म्हणून त्यांच्या कडे पाहिलं जातं. त्यांच्या कडे सर्व सामान्य माणूस सरळ जाऊन भेटतो, आपली कैफियत मांडतो, ठाणेदार ही मात्र तेव्हड्याच उदार मनाने समोरच्या माणसांचे एकाग्र होऊन ऐकून घेतो.जमेल तितकं समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करून सत्य ऐकून घेतो, न्याय देण्यासाठी धडपडतोय, त्यामुळे अलीकडे बल्लारपूर पोलीस स्टेशन हे सर्वसामान्य लोकांना आपलेसे वाटायला लागले हे ही तितकंच खरं.. सामाजिक बांधिलकी जोपसणारं व्यक्तिमत्व म्हणून विपीन इंगळे साहेब लोकप्रिय होत आहेत. काल परवा असेच एका कामगार असलेल्या व्यक्तीला एक फोन आला. तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. दीड लाख रुपये द्या अन्यथा त्याला मारू. एकुलत्या एक मुलाचा जीव वाचविण्यासाठी वडिलांची धडपड, कोवील वाणी चेहरा करून असलेल्या त्या व्यक्ती ला पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करायला सांगितले, तेव्हा तो व्यक्ती मुलाचा जीव धोक्यात आहे. शिवाय पोलीस मदत करणार नाही. तेव्हा सामाजिक कार्यकर्ते राजू झोडे यांनी कर्तव्य दक्ष ठाणेदार विपीन इंगळे साहेबांच्या स्वभावा बाबत सांगितले, सामाजिक जाण असलेला व्यक्ती ठाणेदार म्हणून आपल्या गावात आहे. तेव्हा त्या असाहाय्य वडिलांनी आपली कैफियत इंगळे साहेबांच्या पुढे मांडली. आदरणीय विपीन इंगळे साहेबांनी तपास यंत्रणा कामाला लावली. ठग बाज व्यक्ती ला आपल्या दणकेबाज भाषेत खडसावले. सायबर सेल शी संपर्क करून लोकेशन घेतले. त्या मुलांची सुटका करून ते ठगी लोकं पळून गेलेत. एक रुपया नं खर्च करता, त्या असह्यय व्यक्तीला जणू आधारच मिळाला. त्यांचा मुलगा चिंतेत असलेल्या आई वडिलांच्या पुढ्यात दिसल्याने, स्मित हास्य उमटलं.. आणि पोलीस प्रति विश्वास अधिकच घट्ट झाला.. त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं स्मित हास्य हिच आमची खरी कमाई आहे मी फक्त कर्तव्य बजावलय. नागरिकांनी बे धडक पोलीस स्टेशन ला यावं, आपलं गाऱ्हाणं मांडावं. पोलीस तुमच्या सेवे साठी आहेत असे आवाहन नागरिकांना ठाणेदार विपीन इंगळे यांनी केले. सामाजिक मनाचा ठाव घेणारं व्यक्तिमत्व म्हणजेच ठाणेदार विपीन इंगळे. अशी चर्चा बल्लारपूरात सुरु आहे
संकलन :- पवन भगत, बल्लारपूर
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या