बल्लारपुर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने राजकीय वाटचालीत अनेक चढउतार अनुभवले आहे. मात्र,आजही सर्वसामान्य जनता कांग्रेसच्या पाठीशी आहे. काहींनी सत्ताधारी पक्षाच्या दडपणाखाली आले आहे. परिणामी त्यांनी कांग्रेस पक्षासोबत फारकत घेतली आहे. परंतु चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मी कांग्रेस सोबत एकनिष्ठ आहे. त्यामुळे मला राज्य पातळीवर संधी मिळाली आहे.कांग्रेसच्या कार्यकर्त्यांचै आदरातिथ्य मला ऊर्जा देणारे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनिर्वाचित सचिव घनश्याम मुलचंदानी यांनी बल्लारपूर येथील सत्कार समारंभ रविवार ( दि. 3 ) रोजी व्यक्त केले. बल्लारपूर शहर व तालुका कांग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव पदी घनश्याम मुलचंदानी यांची नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे रविवार (दि. 3) आगस्ट रोजी नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रदेश काँग्रेसचे नवनिर्वाचित सचिव घनश्याम मुलचंदानी, माजी नगराध्यक्ष डॉ. रजनी हजारे, मध्यवर्ती बॅंक चे संचालक डॉ. अनील वाढई, शहर कांग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र आर्य, तालुका कांग्रेसचे अध्यक्ष गोविंदा उपरे, माजी अध्यक्ष अब्दुल करीम शेख, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, सुनंदा आत्राम,छाया मडावी, भास्कर माकोडे, अफसाना सय्यद, डेव्हीड कामपेल्ली, नरसिंह रेब्बावार, प्राणेश अमराज यांची उपस्थिती होती. दरम्यान विविध सामाजिक संस्था, कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश सचिव घनश्याम मुलचंदानी यांचा नागरी सत्कार केला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रास्ताविक शहर काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र आर्य यांनी केले. संचालन नरेश मुदंडा यांनी केले. आभार प्रदर्शन ॲड.पवन मेश्राम यांनी केले. यावेळी कासिम शेख,नरेश आनंद, विवेक खूटेमाटे, करण कामटे, मंगेश बावने, मेहमूद पठान, वासुदेव येरपुडे, नरेश बुरांडे, शिवचरण राजभर, प्रीतम पाटिल, दीपक धोपटे, नाना बुंदेल, महेश सदाला, राजू मारमवार, कैलाश धानोरकार, सुभाष दिवसे, रमेश जक्कू, रोहन कलम्बे, पिंकु हरडे सह शहर व ग्रामीण भागातील कांग्रेस, महिला कांग्रेस, युवा कांग्रेस, सेवादल, एन एस यू आय व इंटक चे पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या