ओबीसी आरक्षणाबाबतची सर्वात मोठी बातमी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 27 टक्के आरक्षणासह होणार (The biggest news regarding OBC reservation is that municipal and local body elections will be held with 27 percent reservation)

Vidyanshnewslive
By -
0

वृत्तसेवा :- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. निवडणुकांमध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षणाला विरोध करणारी तसेच नव्या प्रभागरचनेला विरोध करणारी याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. सुप्रीम कोर्टाने 6 मे रोजीच्या आदेशानुसार 27 टक्के आरक्षण निवडणुकांमध्ये राहील, असे स्पष्ट केले आहे. तसेच 11 मार्च 2022 च्या प्रभागरचने नुसार निवडणुका होणार नाही. नव्या प्रभागरचने नुसार निवडणुका पार पडतील, असेही कोर्टाच्या निकालामुळे आता स्पष्ट झाले आहे. ओबीसी आरक्षण आणि प्रभागरचने विरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने दोन्ही याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी समाजाला त्याचा मोठा राजकीय फायदा मिळणार आहे. त्यामुळे 27 टक्के आरक्षणासह निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसी समाजासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)