७९ वा स्वातंत्र्यदिन निमित्त मुख्य शासकीय कार्यक्रम देवेंद्र फडणवीस, नागपुरात चंद्रशेखर बावनकुडे तर चंद्रपूरात डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण (The main government program on the occasion of the 79th Independence Day will be held by Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankude in Nagpur and Dr. Ashok Uike in Chandrapur. The flag will be hoisted by)
मुंबई :- भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन समारंभ शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. पुणे येथे राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बीड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तर राज्यामधील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पुढील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे, असे सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. या अंतर्गत नागपुरात चंद्रशेखर बावनकुडे तर चंद्रपूरात डॉ. अशोक उईके, वर्धा येथे पंकज भोयर, रायगड मध्ये अदिती तटकरे, गडचिरोली येथे आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहन होणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या