स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, बल्लारपूरातून गडचिरोली जिल्ह्यात जाणारी दारूची तस्करीवर धाड, २३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अटक, एक फरार (Local Crime Branch action, raid on liquor smuggling going from Ballarpur to Gadchiroli district, seized goods worth 23.50 lakhs, one arrested, one absconding)

Vidyanshnewslive
By -
0
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, बल्लारपूरातून गडचिरोली जिल्ह्यात जाणारी दारूची तस्करीवर धाड, २३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, एक अटक, एक फरार (Local Crime Branch action, raid on liquor smuggling going from Ballarpur to Gadchiroli district, seized goods worth 23.50 lakhs, one arrested, one absconding)


बल्लारपूर :- स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आपल्या पथक समवेत उपविभाग राजुरा - गडचांदुर हद्दीत अवैध धंदे विरुध्द कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती वरून कळमना गावाजवळ नाकाबंदी करून महिंद्रा स्कॉर्पिओ क्रं एमएच ३४ सीजे ६ हजार ५७६ या वाहनाला थांबवून तपासणी केली असता त्यात देशी दारू ९० एमएल चा ३ हजार ८०० निपा किंमत १ लाख ३३ हजार रुपये, बिअर ७२ नग किंमत ९ हजार ३६० रुपये, विदेशी दारू ४८ नीपा ८ हजार १६० रुपये, स्कॉर्पिओ चारचाकी वाहन किंमत १५ लाख रुपये तसेच पायलटिंग करीता वापरलेली टाटा अल्ट्रोझ क्रं एमएच ३४ सीजे ७३३७ किंमत ७ लाख रुपये असे एकूण २३ लाख ५० हजार ५२० रुपयाचे मुद्देमाल जप्त केले. विशेष म्हणजे बल्लारपूर शहरातून गडचिरोली जिल्ह्यात दारूची तस्करी होणारी अवैध दारू स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले असून दोन चारचाकी वाहन सहित २३ लाख ५० हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले असून एका आरोपीला अटक केले असून दुसरा आरोपी वाहन सोडून पळून गेला. आरोपी नितीन राजन कुंडे (३५) रा राजेंद्र प्रसाद वॉर्ड बल्लारपूर यास ताब्यात घेतले असून आरोपी सिद्धार्थ उर्फ बापू भास्कर रंगारी रा कारवा रोड, रविंद्र नगर वॉर्ड बल्लारपूर हा फरार आहे. सदर कारवाई १ जुलै रोजी रात्री ९ - १० वाजताच्या सुमारास कळमना जवळ केले. आरोपी विरुध्द बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे अप क्रं ४६२/२५ कलम ६५(अ), ८३ मदाका अन्वये गुन्हा नोंदविला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक दीपक काँक्रिडवार, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा किशोर वैरागडे, अजय बागेसर, प्रमोद कोटनाके, पोअं शेखर माथनकर, गोपीनाथ नरोटे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)