नागपूर :- राज्यात पाच नवीन प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दिला आहे. त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याच्या न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाचे संचालक डॉ. विजय ठाकरे यांनी दिली. नागपुरातील प्रयोगशाळेत शनिवारी झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. राज्यात प्रत्येक वर्षी न्यायवैद्यक प्रयोगशाळेवर १० टक्के कामाचा भार वाढत आहे. मुंबई व नागपुरातील प्रयोगशाळेवर सर्वाधिक भार आहे. नागपुरातील भार मुंबईहून सुमारे २ हजार नमुन्यांनी जास्त आहे. हा भार हलका करण्यासाठी संचालनालयाने चंद्रपूर, धुळे, रत्नागिरी, ठाणे, सोलापूर येथे नवीन प्रयोगशाळा उभारण्याचा प्रस्ताव शासनाला दिला आहे. सध्या येथे लघु न्यायवैद्यक प्रयोगशाळा आहेत. शासनाला ६७९ कायम पदे भरण्याचा प्रस्तावही दिला असून त्याला मंजुरी मिळताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ही पदे भरली जाणार असल्याचेही डॉ. ठाकरे यांनी सांगितले.
तीन नवीन प्रकल्पांचे लोकार्पण आज नागपुरातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत सात मजली नवीन इमारतीचे भूमिपूजन १३ जुलैला सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी येथूनच राज्य स्तरावर तीन नवीन कार्यान्वित प्रकल्पांचे लोकार्पण होईल. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अड. आशीष जयस्वाल, पंकज भोयर, योगेश कदम, खासदार श्यामकुमार बर्वे यांच्यासह महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) संजय कुमार वर्मा, अर्चना त्यागी, डॉ. विजय ठाकरे, अश्विन गेडाम उपस्थित राहतील.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या