बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत सहाय्यक फौजदार विनायक धुर्वे यांचे उपचारा दरम्यान निधन (Assistant Faujdar Vinayak Dhurve, working at Ballarpur Police Station, passed away during treatment.)
बल्लारपूर :- बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत सहाय्यक फौजदार विनायक धुर्वे यांचे रात्री निधन झाले आहे. ते ५४ वर्षाचे होते. सफौ विनायक धुर्वे यांच्यावर मागील एक महिन्यापासून नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना बीपी, सुगर चा त्रास होता. विशेष म्हणजे त्यांनी पोलीस विभागात ३४ वर्ष सेवा केली आहे. तसेच त्यांचे किडनी निकामी झाले होते. त्यांना डायलिसिस वर ठेवण्यात आले होते. त्यांना किडनी प्रत्यरोपण करणार होते. पण त्यांची प्रकृती खालावल्याने प्रत्यरोपन झाले नाही. अश्यातच रात्री त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचे निधन झाले. त्यांना मागील महिन्यात सहाय्यक फौजदार म्हणून पदोन्नती मिळाली होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व आप्तपरिवार आहे. आज दुपारी २ वाजता त्यांचे मूळ गाव विसापुर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या