ग्रामविकास संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरण, अनाथ, गरजू ,वंचित मुलांसाठी मोलाचे कार्य - मंजुषा कोराळे (Free uniform distribution to students by Gram Vikas Sanstha, valuable work for orphans, needy and underprivileged children - Manjusha Korale)

Vidyanshnewslive
By -
0
ग्रामविकास संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरण, अनाथ, गरजू ,वंचित मुलांसाठी मोलाचे कार्य - मंजुषा कोराळे (Free uniform distribution to students by Gram Vikas Sanstha, valuable work for orphans, needy and underprivileged children - Manjusha Korale)


छत्रपती संभाजीनगर :- दि.19/07/2025 ला (शनिवार) अनाथ गरजू वंचित मुलासाठी ग्रामविकास संस्थेचे मोलाचे कार्य आहे असे मत सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक शाखा सिडकोच्या व्यवस्थापक मंजुषा कोराळे यांनी व्यक्त केले. त्या ग्रामविकास संस्था माहिती व सल्ला केंद्रातर्फे ग्रामविकास भवन एन टू सिडको येथे शालेय मुलांसाठी मोफत गणवेश वितरण प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष जयश्री हदगल, सचिव नरहरी शिवपुरे, शिवाजीराव घुगे, मीनाक्षी बिराजदार, भारती खरटमल, सतीश वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले, गणवेश हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा आरसा आहे. आपण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आयुष्यात मोठे व्हा व इतरांनाही निश्चित मदत करा. ग्रामविकास संस्थेसह समाज आपल्या पाठीशी आहे. या कार्यक्रमात सिडको मधील ज्ञानेश विद्यामंदिर, शिवतेज ,भगवती ,व्यंकटेश, गणपतराव जगताप व सुशीलादेवी या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पवार यांनी केले तर आभार राजश्री बागडे यांनी मानले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवृत्ती घोडके, संदीप शिंदे, रूपाली शिवपुरे, अजिंक्य शिवपुरे यांनी परिश्रम घेतले.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)