बल्लारपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर यांचा ८० वा वाढदिवस उत्साहात साजरा (Senior journalist Vasant Khedekar's 80th birthday celebrated with enthusiasm in Ballarpur city)
बल्लारपूर :- येथील संत तुकाराम सभागृहात दैनिक लोकमतचे बल्लारपूर शहरातील ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर यांचा ८० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शहरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून वसंत खेडेकर यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल होते. यावेळी माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. रजनीताई हजारे, राजुरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, वसंत खेडेकर आणि विमलबाई खेडेकर मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात भाजप प्रदेश कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य पत्रकार अजय दुबे, माजी नगराध्यक्ष लखनसिंह चंदेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता वैभव जोशी, काँग्रेस शहराध्यक्ष पत्रकार देवेंद्र आर्य, राकेश मूलचंदानी, शिवचंद्र द्विवेदी, मंगल जीवने, रमेश निषाद, मनोहर दोतपल्ली, अनिल पांडे, ज्ञानेंद्र आर्य, घनश्याम बुरडकर, नरेंद्र सोनारकर, नारद प्रसाद, अनेकेश्वर मेश्राम, सुभाष भटवलकर, मुन्ना खेडकर, विशाल डुंबेरे, दिपक भगत, मनिष तावाड, श्रीनिवास कंदकुरी यांच्यासह बल्लारपूर शहरातील पत्रकार बांधव व्यापारी, प्राध्यापक, शिक्षक, अधिकारी तसेच अनेक नागरिकांनीही उपस्थित राहून खेडेकर कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. वसंत खेडेकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र निलेश, योगेश, राजेश खेडेकर यांच्यासह संपूर्ण कुटुंब, बहिणी, नातवंडे आणि इतर नातेवाईकांनी या आनंद सोहळ्यात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन प्रा. डॉ. श्रवण बानासुरे यांनी केले आदी मान्यवर उपस्थित होते.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या