चंद्रपूर :- राज्य शासनाच्या वर्ग-3 व वर्ग-4 पदाकरीता घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर शिकवणी 1 ऑगष्ट 2025 पासून सुरु होणार आहे. सदर प्रशिक्षण 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. अनुसूचित जमातीच्या (ST) प्रवर्गातील उमेदवारांनी 29 जुलै 2025 पर्यंत आदिवासी "उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, चंद्रपूर या कार्यालयात आधार कार्ड, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचे पत्राणपत्र व बँकेचे पासबुक या कागदपत्राच्या छायाप्रतीसह नोंदनी फॉर्म भरून द्यावे. नोंदणी केलेल्या उमेदवारांची 30 जुलै रोजी मुलाखत (Interview) राहील व 31 जुलै रोजी निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल, निवड झालेल्या उमेदवारांचे 1 ऑगष्ट 1 पासून नियमित वर्ग चालू होईल. सदर मार्गदर्शन केंद्रात गणित, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धीमता चाचणी असे चार विषय शिकविले जातात सोबतच चार पुस्तकाच्या संचासह 1 हजार (एक हजार रुपये) प्रतीमाह विद्यावेतन दिले जाते. याबाबत अधिक माहितीसाठी मनोज सिडाम 9764580986 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा. जिल्हातील सर्व आदिवासी उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रोशन गभाले यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या