राज्य शासनाच्या 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024' साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ (Deadline for sending entries for the State Government's 'Outstanding Journalism Award 2024' extended till July 19)

Vidyanshnewslive
By -
0
राज्य शासनाच्या 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024' साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ (Deadline for sending entries for the State Government's 'Outstanding Journalism Award 2024' extended till July 19)


मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठो पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. था स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी. २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/व्रतकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दि. ३१ जानेवारी, २०२५ असा होता. आता या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याकरिता दि. १९ जुलै, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२. येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने http://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)