राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉच्या परिसरात संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University Dr. Babasaheb Ambedkar School of Law premises, Samvidhan Prasadika Park and the full-length statue of Dr. Babasaheb Ambedkar were inaugurated.)

Vidyanshnewslive
By -
0
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉच्या परिसरात संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University Dr. Babasaheb Ambedkar School of Law premises, Samvidhan Prasadika Park and the full-length statue of Dr. Babasaheb Ambedkar were inaugurated.)


नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉच्या परिसरात संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक मूल्य आणि भारतीय शाश्वत मूल्य यांची उत्तम सांगड घालत भारतीय संविधानाची निर्मिती केली असून उद्देशिका हा संविधानाचा गाभा आहे. उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार देशातील नागरिकांनी करावा त्यामुळे देशातील ९० टक्के प्रश्न कायमचे सुटतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात भारतीय संविधानाचे धडे गिरविले व संविधानिक मूल्य कृतीत आणले त्याच महाविद्यालयात संविधान उद्देशिका पार्क आणि त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत आहे ही महत्त्वाची व समाधानाची बाब आहे. 


              संविधानातील मूल्यांवर चालत भारताने जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळविला आहे. उद्देशिका संविधानाचा गाभा आहे. यातील निहीत मूल्यांचा सर्व नागरिकांनी अंगिकार करणे गरजेचे आहे. याची प्रेरणा येथे भेट देण्याऱ्या प्रत्येकाला मिळेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाची नवीन इमारत बांधण्यात येईल व या पार्कला आवश्यक सर्व सोयी -सुविधा पुरविण्यात येतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, माजी मंत्री नितीन राऊत, माजी खासदार जोगेंद्र कवाडे, सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख सचिव हर्षदीप कांबळे, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे, संविधान उद्देशिका पार्क समितीचे अध्यक्ष गिरीष गांधी आदी उपस्थित होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)