जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य शासकीय योग दिन, योगाच्या माध्यमातून मानवाचा शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक संगम - पालकमंत्री डॉ. अशोक उईके (On behalf of the district administration, the main government Yoga Day, physical, mental and spiritual union of humans through yoga - Guardian Minister Dr. Ashok Uike)

Vidyanshnewslive
By -
0
जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य शासकीय योग दिन, योगाच्या माध्यमातून मानवाचा शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक संगम - पालकमंत्री डॉ. अशोक उईके (On behalf of the district administration, the main government Yoga Day, physical, mental and spiritual union of humans through yoga - Guardian Minister Dr. Ashok Uike)


चंद्रपूर : धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे आज अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले आहे. यावर मात करून निरोगी आणि उत्तम जीवन जगायचे असेल तर दैनंदिन जीवनात योगा करणे आवश्यक आहे. हा एक केवळ व्यायामच नाही तर योगामुळे मानवाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संगम साधण्यास मदत होते, असे विचार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित मुख्य शासकीय योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे, अश्विनी सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, सुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संयुक्त राष्ट्र संघटनेने योगाचे महत्व ओळखले आणि 21 जूनला आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा ठराव पारीत केला. गत 11 वर्षांपासून जगातील 177 देशांमध्ये योग दिन साजरा केला जात आहे. ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ ही 2025 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे. जिल्हा प्रशासनाने पतंजली योग समिती आणि विविध संघटनांच्या माध्यमातून चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पुढील वर्षापासून सर्वांनी एकत्रित येऊन शासकीय योग दिन साजरा करावा. चंद्रपूरात योग संगम दिसणे आवश्यक आहे. पुढील आंतरराष्ट्रीय योग दिन यापेक्षा मोठ्या स्वरूपात व खुल्या मैदानात आयोजित करावा, अशा सुचनाही पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिल्या. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुजन करण्यात आले. यावेळी योगशिक्षिका वैजंती गौरकार आणि कविता मंघानी यांनी उपस्थितांना योगाचे प्रात्याक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे संचालन मंगला घोगी आसुटकर यांनी केले. कार्यक्रमाला क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, मोरेश्वर गायकवाड, नंदू आवारे, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, जयश्री देवकर, संदीप उईके, विजय ढोबाळे यांच्यासह पतंजली योग समितीचे इतर सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          चांगले व निरोगी आयुष्य योगामुळे शक्य -  आमदार किशोर जोरगेवार आज 11 वा आंतराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करीत आहोत. देशाच्या पंतप्रधानांनी योगाचे महत्व जगाला पटवून दिले, त्यामुळेच याला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. अनादी कालापासून भारतात योग सुरू असून याला अनन्यसाधारण महत्व आहे. चांगले आयुष्य केवळ योगामुळेच मिळू शकते. कोणत्याही आजारावर नियंत्रण मिळवायचे असेल किंवा मनाच्या शांतीसाठी योगा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. उपस्थितांनी केली ही आसने कपालभारती प्राणायाम, अनुलोमविलोम, ब्राभरी प्राणायाम, वज्रासन, स्कंदसंचालन, स्कंदस्थलांतरण, स्कंदचक्र, घुटनासंचालन, ताडासन, वृक्षासन, पादअष्टासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, अर्धवज्रासन, उत्तंगासन, वक्रासन, भुजंगासन, अर्धहलासन, पवनउत्तासन, शवासन आदी आसने करण्यात आली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)