बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातील विसापूर जवळ असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमात भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्व. ताराबाई सदाशिव गर्गेलवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री अशोक गर्गेलवार यांनी आपल्या आईच्या पुण्यतिथी निमित्ताने वृद्धाश्रमात भोजनदान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी येथील वृद्ध आजी-आजोबा रुचकर भोजन प्राशन करून तृप्त झाले तसेच " कुटुंबियांने नाकारलेल्या व आयुष्याच्या उतार वयात आम्हांला या वृद्धाश्रमाणे आधार दिला व स्वयंनिर्भर बनविले तसेच जीवन जगायचे शिकविले " अशी भावना सुध्दा आजी आजोबानी व्यक्त केली व कोणत्याना कोणत्या प्रसंगातून समाजातील काही व्यक्ती/घटक आम्हाला आठवण करून भेटायला येतात व आमच्या सोबत वेळ घालवितात. याप्रसंगी अशोक गर्गेलवार व कुटुंबियांनी आपल्या आईच्या स्मृतीदिना निमित्ताने आम्हाला आठवण केली त्यामुळं आम्ही धन्य झाली व स्व. ताराबाई गर्गेलवार यांना सदगती प्राप्त होईल हीच मंगल कामना याप्रसंगी व्यक्त केली.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या