ज्या शेतात आईने शेतमजूर म्हणून काम केलंय मुलाने चक्क ती शेतीच विकत घेतलीय 90 रु महिना कमावणारा, ज्याने जिद्दीच्या बळावर उभी केलीय 500 कोटीची कंपनी (The son has bought the farm where his mother worked as a farm labourer. A man who earns Rs 90 a month, who built a company worth Rs 500 crore through sheer determination.)

Vidyanshnewslive
By -
0
ज्या शेतात आईने शेतमजूर म्हणून काम केलंय मुलाने चक्क ती शेतीच विकत घेतलीय 90 रु महिना कमावणारा, ज्याने जिद्दीच्या बळावर उभी केलीय 500 कोटीची कंपनी (The son has bought the farm where his mother worked as a farm labourer. A man who earns Rs 90 a month, who built a company worth Rs 500 crore through sheer determination.)


वृत्तसेवा :- सांगली जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या अथक संघर्षामधून स्वतःची एक नवी ओळख निर्माण करणारे यशस्वी मराठी उद्योजक म्हणजेच अशोक खाडे. एका अत्यंत गरीब कुटुंबातून येऊन, स्वतःच्या जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर दास ऑफशोर इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड (Das Offshore Engineering Pvt. Ltd.) या ५०० कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या कंपनीचे मालक बनलेले अशोक खाडे हे एक प्रेरणादायी उद्योजक आहेत. त्यांची यशोगाथा अनेक तरुणांसाठी आदर्श आहे. अशोक खाडे हे चिकाटी आणि मेहनतीने आपले भाग्य बदलणारे व्यक्ती आहेत. इच्छाशक्तीच्या बळावर माणूस काय काय करू शकतो हे अशोक खाडेंकडे पाहिल्यावर समजते. एकेकाळी त्यांच्या कुटुंबाला दोन वेळच्या भाकरीसाठी प्रचंड संघर्ष करावा लागला, पण आज या त्यांच्या कंपनीचा जगभरात 500 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय आहे. खाडे यांच्या विविध कंपन्यांमध्ये 4500 लोक काम करतात. अशोक खाडे यांचे कुटुंबीय हे वारकरी संप्रदायातील आहे. कुटुंबातील गरिबीशी झुंज देत आपल्या मोठ्या भावाच्या पाठोपाठ अशोक यांनीसुद्धा माझगाव डॉकयार्डमध्ये हँडमॅन म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि त्या बदल्यात त्यांना 90 रुपये स्टायपेंड मिळू लागला. त्यांच्या मेहनतीने त्यांनी जहाज डिझायनिंगचे प्रशिक्षण घेतले आणि नंतर काम करताना मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केला. माझगाव डॉकमध्ये त्यांनी चार वर्ष नोकरी केली. त्यानंतर एक वर्ष ते जर्मनीला गेले होते. अशोक यांनी माझगाव डॉकयार्डमध्ये काम करत असताना परदेशात जर्मनीला प्रशिक्षणासाठी गेले, तेव्हा इतर लोकांना त्याच कामासाठी त्यांच्यापेक्षा 12 पटीने जास्त पगार मिळाला आणि त्याच दिवशी त्यांनी यापुढे नोकरी करायची नाही, असं ठरवलं. अशोक खाडे यांनी माझगाव डॉक सोडले तेव्हा त्यांच्याकडे फक्त दहा हजार रुपये होते. व्यवसाय सुरू करत असतानाही त्यांच्याकडे जागा नव्हती. कार्यालय नव्हते. त्यांनी एका टेबलावर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. अशोक खाडे यांनी नोकरी सोडून एक कंपनी स्थापन केली आणि दत्तात्रेय, अशोक आणि सुरेश या तीन भावांच्या नावाची पहिली अक्षरे जोडून त्यांनी त्या कंपनीला दास ऑफशोअर इंजिनीअरिंग असे नाव दिले. सुरुवातीला त्यांच्या कंपनीनं समुद्रात तेल काढण्याचे प्लॅटफॉर्म म्हणून काम केले. त्यात त्यांना प्रचंड यश मिळालं आणि आज तिन्ही भावांनी मिळून आणखी अनेक कंपन्या स्थापन केल्यात.
              दास ऑफशोर ही आज एक सुप्रसिद्ध कंपनी आहे, जी ओएनजीसी, एल अँड टी, एस्सार आणि भेल यांसारख्या मोठ्या कंपन्यांसाठी काम करते. त्यांच्या कंपनीनं समुद्रात 100 हून अधिक प्रकल्प पूर्ण केलेत. त्यांनी ज्या शेतात त्यांची आई शेतमजुरी करत होती, तीच शेती विकत घेतली आहे, हे त्यांच्या यशाचे आणि मातीशी असलेल्या नात्याचे द्योतक आहे आजही अशोक खाडे आपल्या कमाईतील एक भाग समाजासाठी, एक भाग देवासाठी, एक भाग कामगारांसाठी आणि उरलेला स्वतःसाठी असे वाटप केले आहे, हे त्यांची सामाजिक बांधिलकी दर्शवते. एकीकडे बीएमडब्ल्यूमध्ये फिरणारे खाडे दरवर्षी पंढरीची पायी वारी करतात, जी त्यांची साधेपणा आणि आध्यात्मिक वृत्ती दाखवते. आज अशोक खाडे हे केवळ देशासाठीच नव्हे, तर जगातील अशा लोकांसाठी एक उदाहरण आहे, ज्यांना त्यांच्या कष्ट आणि शिक्षणाच्या बळावर पुढे जायचे आहे. न्यूयॉर्क टाईम्सने अशोक खाडे यांच्या संघर्षाची कथाही पहिल्या पानावर प्रकाशित केली होती, म्हणून स्वीडनमध्ये आजही त्यांच्या संघर्षाची कहाणी अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शिकवली जाते.



संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)