अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरुणांसाठी मार्जिन मनी' योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना (Margin Money Scheme for Scheduled Caste Youth Entrepreneurs, Karmaveer Dadasaheb Gaikwad Empowerment and Self-Respect Scheme)

Vidyanshnewslive
By -
0
अनुसूचित जातीच्या नवउद्योजक तरुणांसाठी मार्जिन मनी' योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना (Margin Money Scheme for Scheduled Caste Youth Entrepreneurs, Karmaveer Dadasaheb Gaikwad Empowerment and Self-Respect Scheme)


चंद्रपूर : केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया' योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र नवउद्योजक तरुणांना मार्जीन मनी उपलब्ध करून देण्याबाबतची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील सवलतीस पात्र 18 वर्षावरील नवउद्योजक तरुणांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास 'स्टँड अप इंडिया' योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के हिस्सा (अनुदान) राज्य शासनामार्फत देण्यात येईल. सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन स्तरावरून निश्चित करण्यात आल्या आहेत. चंद्रपुर जिल्ह्यातील पात्र इच्छूक नवउद्योजक तरुणांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपुर या कार्यालयाशी संपर्क साधावा व सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, यांनी केले आहे.
              कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसुचित जाती व नवर्वाद्ध घटकांच्या दारिद्ररेषेखालील भुमिहीन कुटुंबाना कायमचे उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे, तसेच त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा म्हणून कसण्याकरिता चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमीन खरेदी करून उपलब्ध करून द्यायची आहे. तरी जिल्ह्यातील गैर आदिवासी कुटुंबाकडुन शेतजमीन खरेदी करावयाची असल्याने विक्रीस इच्छुक शेतकऱ्यांकडून सन 2025-26 करिता अर्ज मागविण्यात येत आहे. जिरायत जमीन चार एकर व बागायती जमीन दोन एकर विक्री करण्यास तयार असल्यास सम्मती पत्रासह पटवारी साझानिहाय अर्ज सादर करावेत. जमिनीचे दर हे प्रचलित शासकीय दरानुसार निश्चित करण्यात येतील किंवा वाटाघाटी करून जिल्हास्तरीय समितीद्वारे मुल्य निश्चित करण्यात येईल. आवश्यक कागदपत्रे : अर्जासोबत जमिनीचा 7/12, गाव नमुना आठ, परिसरातील प्राथमिक सहकारी कृषी पतपुरवठा सेवा सोसायटीची कुठल्याही प्रकारची थकबाकी किंवा कर्ज बोजा नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र, अर्जदाराचे कुटुंबातील सख्खे भाऊ, पत्नी, मुले यांचे जमीन विकण्यासंबंधी ना-हरकत व सम्मती प्रमाणपत्र. विक्रीच्या शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याची मोजणी विभागाचे टाचण व नकाशासह अहवाल शेतजमीन विक्री प्रस्ताव समितीने खरेदी करणे बंधनकारक असणार नाही. जमिनीच्या खरेदी प्रक्रीयेमुळे कोणतीही नुकसान भरपाई मागणार नसल्याबाबत तसेच जमीनबाबत कोणत्याही न्यायालयामध्ये वाद सुरू नसल्याबाबतचे संबंधित शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्याचे 100 रुपये स्टँप पेपरवर शपथपत्र व हमीपत्र जोडण्यात यावे. सदर प्रस्ताव 31 मे 2025 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपुर या कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये पाठविण्यात यावे, असे आवाहन सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)