स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील चोरी प्रकरणात 4 आरोपीना मुद्देमालासह अटक (Local Crime Branch action, 4 accused arrested with valuables in theft case at Government Medical College)
चंद्रपूर :- चंद्रपूर येथील नव निर्मित मेडिकल कॉलेज येथे सुरू असलेल्या बांधकाम येथील ऑक्सीजन आउटलेट कापर पाईप चोरी झाले होते. त्यात स्थानिक गुन्हे शाखेने तत्परतेने कारवाई करत चार आरोपींना अटक करून त्यांच्या जवळून १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. गोल उर्फ सुमोहित चंद्रशेखर मेश्राम (२७) रा. बायपास रोड, अष्टभुजा रोड, चंद्रपुर, राहुल रतन रॉय (१९) रा. आझाद चौक, शामनगर, चंद्रपुर, सुंदरम संजय तिवारी, (२१) रा. बायपास रोड, अष्टभुजा वार्ड, चंद्रपुर, कमलेश दादुभाई गुप्ता (२९) रा. अष्टभुजा वार्ड, चंद्रपुर असे आरोपींचे नाव असून स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील पथकातील अधिकारी व कर्मचारी ५ मे रोजी उपविभाग चंद्रपूर येथे पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शनात तसेच अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक, स्थागुशा यांचे नेतृत्वात चंद्रपुर शहरात अवैध धंद्यावर कारवाई करणे तसेच घरफोडी, चोरी प्रकरणातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याकरिता पेट्रोलींग करीत असतांना विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी गोलु उर्फ सुमोहीत मेश्राम रा. अष्टभुजा वार्ड, चंद्रपुर हा त्याचे साथीदारासह नविन मेडीकल कॉलेज, चंद्रपुर येथील सुरू असलेल्या बांधकाम येथील ऑक्सीजन आउटलेट कापर पाईप चोरी करून आपले घरामागे ठेवले आहे अशा खबरे वरून आरोपीस ताब्यात घेवुन त्याच्या कडुन व त्याचे इतर साथीदारांकडुन ऑक्सीजन आउटलेट कापर पाईप व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकुण असा एकुण १ लाख ७५ हजार रूपयाचा माल जप्त करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे. आरोपींना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोलीस उपनिरीक्षक सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सतिश अवथरे, पोहवा रजनिकांत पुठ्ठवार, पोहवा दिपक डोंगरे, पोअं प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार यांनी केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या