बल्लारपूर :- बुध्दगया महाबोधी महाविहार हे बिहार राज्यातील असून 1949 च्या बोधगया टेम्पल ऍक्ट अंतर्गत येथील प्रशासनातून मुक्त करण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात सहभाग नोंदवण्यासाठी बल्लारपुरातील उपासक, उपासीका आज दि. 08 मे रोजी सकाळी 6 वाजता बुध्दगयाला रवाना झाले. याअनुषंगाने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दि. 7 मे ला भिक्षुनिवास पाली बुध्दविहार समीतीचे वतीने सत्कार कार्यक्रम आयोजित करन्यात आला होता. याप्रसंगी पंचशील दुपट्टा, गुलाबाचे पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्यांचा सत्कार तुलसीदास खैरे, संघमित्रा रंगारी, शांताबाई मुन, अनुबाई नगराळे, संगिता घोटेकर, रसिका वाघमारे, अर्पर्णा खोब्रागळे, बनसोडताई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आंदोलनात मंगलाताई झाडे यांच्या नेतृत्वात वैशालीताई लाडे, अनु पेटकर, नंदा देशभ्रतार, प्रेमीला लभाने, अल्का अलोने, सुनंदा कांबळे, सुप्रीया चंदनखेडे, सुरेश पाटील हे सहभागी होणार असून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धम्ममित्र भास्कर भगत यांनी मार्गदर्शन केले. संचालन व आभार प्रदर्शन धम्ममीत्र संपत कोरडे यांनी केले.कार्यक्रमात मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या