बल्लारपूर :- बल्लारपूर येथील स्थानिक विश्रामगृहात महाराष्ट्र पत्रकार संघ शाखा चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षपदी अजय रासेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष प्रा. विलासराव कोळेकर यांनी केली आहे. काल बल्लारपूर येथे झालेल्या महाराष्ट्र पत्रकार संघटनेच्या बैठकीत उपस्थित सर्व पत्रकारांनी जिल्हाध्यक्ष अजय रासेकर यांचे स्वागत केले आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघ बल्लारपूर शाखेचे अध्यक्ष रमेश निषाद, उपाध्यक्ष शांतीकुमार गिरमिल्ला, सचिव परिष मेश्राम, कोषाध्यक्ष धनंजय पांढरे, सहसचिव विशाल डुबेरे, राजू राठोड, देवेंद्र झाडे, सदाशिव शर्मा आदी उपस्थित होते. त्यांच्या नियुक्तीबद्दल अजय रासेकर यांनी प्रदेशाध्यक्ष विलासराव कोळेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य पद्माकर पांढरे, विदर्भ संपर्क प्रमुख भोला गुप्ता, बल्लारपूर अध्यक्ष रमेश निषाद, राजुरा अध्यक्ष संजय रामटेके यांच्यासह बल्लारपूर व राजुरा येथील सर्व पत्रकारांचे आभार मानले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या