वेकोली अधिकाऱ्यांच्या वसाहतीत दरोडा प्रकरणात तीन विधी संघर्ष बालक सहित पाच आरोपींना अटक, बल्लारपूर पोलिसांची कारवाई (Five accused including three children arrested in robbery case in Vekoli officers' colony, Ballarpur police take action)

Vidyanshnewslive
By -
0
वेकोली अधिकाऱ्यांच्या वसाहतीत दरोडा प्रकरणात तीन विधी संघर्ष बालक सहित पाच आरोपींना अटक, बल्लारपूर पोलिसांची कारवाई (Five accused including three children arrested in robbery case in Vekoli officers' colony, Ballarpur police take action)


बल्लारपूर :- १४ मे ला कॉलरी वसाहत येथे पडलेल्या दरोड्याच्या आरोपींना बल्लारपूर पोलीसांना यश आले असून तीन विधी संघर्ष बालक सहित पाच आरोपींना अटक करण्यात आले. मनिष जगदिश रप्तान (१९) रा. साईबाबा वार्ड, बल्लारपुर, प्रिन्स उर्फ कालु संग्राम बहुरीया (१९) रा.सरदार पटेल वार्ड, बल्लारपुर असे आरोपीचे नाव असून तीन विधी संघर्ष बालक आहेत. त्यांच्या कडून ८ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. बल्लारपूर पोलीसांनी वेगवेगळे पथक तयार करून आरोपी चे शोध घेत होते. एक पथक बल्लारपूर व चंद्रपूर जिल्ह्यात, दुसरे पथक परजिल्ह्यात तर तिसरे पथक परराज्यात आरोपीचे शोध घेत होते. पोलीसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींना उत्तर प्रदेश च्या चीतापुर येथून अटक केले तर काही आरोपींना अमरावती जिल्ह्यातून अटक करून आणले. आरोपींचे अधिक चौकशी केले असता मनिष जगदिश रप्तान (१९) रा. साईबाबा वार्ड, बल्लारपुर, प्रिन्स उर्फ कालु संग्राम बहुरीया (१९) रा. सरदार पटेल वार्ड, बल्लारपुर व तीन विधीसंघर्षग्रस्त बालक यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. आरोपीतांना विश्वासात घेवुन त्यांचकडे तपास केला असता त्यांनी सदर गुन्हयात चोरी गेलेले सोन्याचे दागीने असा एकुन ७ हजार ४३ हजार रुपयांचे चे सोन्याचे दागीने व सदर गुन्हयात वापरलेल्या दोन मोटार सायकल किंमत ८० हजार रुपये असे एकूण ८ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच घराचे कागद पत्र जप्त करण्यात आला आहे. सदरच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेणे शक्य झाले, गुन्हयातील आरोपीतांची संख्या ही वाढत गेल्याने, सदरच्या गुन्हयात कलम ३१० (दरोडा) भारतीय न्याय संहिताचे कलमवाढ करण्यात आलेले आहे. सदर ची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव राजूरा यांचे मार्गदर्शनात तसेच सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूरचे पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके, सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकर, पोशि कार्तीक व सायबर पोलीस स्टेशनची संपुर्ण टिम यांच्या मदतीने पोलीस निरिक्षक श्याम गव्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत भोयर, सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे, सफौ आनंद परचाके, पोहवा. रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, सुनिल कामतकर, पुरूषोत्तम चिकाटे, पो. अंमलदार शरदचंद्र कारूष, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, चंद्रशेखर माथनकर, भास्कर चिचवलकर, म. पो. अंमलदार अनिता नायडू, इत्यादी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने गुन्हा उघडकीस आणला आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)