वृत्तसेवा :- महाबोधी महाविहाराचा इतिहास जवळपास २५०० वर्ष जुना आहे. जेथे बुध्दांना ज्ञान प्राप्ती झाली आहे. त्याच स्थानावर या महाबोधी महाविहारची स्थापना करण्यात आली आहे. देवांन पियदस्सी असोक राजांनी जेव्हा ते अखंड भारताचे सम्राट झाले तेव्हा त्यांनी चार धम्म यात्रा काढली होती. १) लुंबिनी :- जन्मस्थान २) सारनाथ :- धम्मचक्क परिर्वतन स्थान ३) कुशीनगर :- महापरिनिब्बाण स्थान ४) बोधगया :- ज्ञान प्राप्ती स्थान म्हणजे महाबोधी महाविहार सम्राट असोकांनी महाबोधी महाविहार विटांचा बांधला. हि विटांची संरचना भारतातील सर्वात जुनी संरचना म्हणून युनेस्कोने घोषित केले आहे. यामुळे या महाविहारची विटांचे बांधकामाचे स्थापना करण्याचे श्रेय सम्राट असोकांना दिले जाते. सम्राट असोकांनी जेथे बुध्दांना ज्ञान प्राप्ती झाली होती तेथेच महाबोधी महाविहार बांधला. बोधीवृक्षा खाली बुध्दांनी जिथे ध्यान लावले त्या ठिकाणी हिर्याचे वज्रासन देखील बनवले. सम्राट असोकांनी बोधीवृक्षच्या संरक्षणासाठी दगडी कुंपण बांधण्यात आले होते ते आजही तेथे आपणास बघावयास मिळते. सम्राट असोकांमुळे बौध्द धर्म संपूर्ण जगात पोहचला. सम्राट असोकांमुळे बोधगया हे एक समृद्ध बौध्द धर्मीक केंद्र बनले. वास्तूकलेचे एक मोठे केंद्र म्हणून मगध साम्राज्य उद्यास आले. वेळोवेळी बोधगयेत जुन्या कामांचा विस्तार व नवनवीन कामे येथे होऊ लागली. पाचव्या सहाव्या शतकात गुप्त काळात महाबोधी विहाराच्या पुर्ननिर्माण करण्यात आले. गुप्त काळात कला, वास्तूकला व साहित्य कलेचा खुप मोठ्या प्रमाणात विकास झाला. गुप्त साम्राज्य बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाला. महाबोधी विहाराचे शिखर ५५ मीटर उंच असून शिखर हे त्या काळातील सर्वात उंच शिखर व वास्तू कलेचा उत्तम उदाहरण असून हे शिखर वर निमुळते होत जाते. विहाराच्या चारही दिशांना चार लहान लहान शिखर आहेत. जी महाविहारास अधिक विशाल व सुंदर बनते गर्भगृहात एक बुध्दांचे सुंदर भुमीस्पर्श मुद्रातील बुध्दशिल्प आहे. हे शिल्प पाला राजवंशानी बनवले होते. व या शिल्पाला सोनेरी रंग लावण्यात आला होता. महाबोधी महाविहाराच्या दगडी कुंपणावर बुध्दांच्या जीवनसंबधी शिल्पपट कोरण्यात आले आहे. येथील शिल्पकला उत्कृष्ट स्वरुपातील आहे. गुप्त काळानंतर बौद्ध धर्माला उतरती कळा लागली सातव्या शतकानंतर भारतात ब्राह्मण धर्माचा उत्कर्ष होण्यास सुरुवात झाली. याकाळात बौद्धांवर खूप अन्याय करण्यात आला. बाराव्या शतकात तुर्कांनी भारतावर आक्रमण केले. त्यांनी भारतातील विहार नष्ट केलीत. महाबोधी विहाराचे खूप मोठे प्रमाण नुकसान करण्यात आले. या आक्रमकनंतर महाबोधी विहार हे खंण्डर झाले. बाराव्या शतकानंतर बौद्ध धर्म भारतातून जवळ जवळ नष्ट झाला होता. म्हणजे बौद्ध धर्माचे ब्राह्मणीकरण करण्यात आले आहे. म्हणजे बौद्धांचे सण, उत्सव, परंपरा एवढेच काय तर बौद्ध धर्माचे विहार व त्यातील महायानी व वज्रयानी देवांचे हि ब्राह्मणीकरण करण्यात आले. ते ब्राह्मणी देव आहेत असा कांगावा करण्यात आला. भारतातील भिक्खूंना दिसता क्षणी मारण्यात आले. परिणामी उरलेले भिक्खू हे श्रीलंका, तिब्बत, नेपाळ, चीन म्यानमार थायलंड येथे निघून गेले. जगातील भव्यदिव्य, ज्ञानाचा केंद्र बिंदु असलेले बोधगयेतील महाबोधी महाविहार उजाड झाले. सोळाव्या शतकात एक शव सन्यासी समुहाने महाबोधी विहार ताब्यात घेतले. जसे भारतात इतर बौद्ध विहारांचा वापर हिंदू मंदिरे म्हणून केला जातो तसाच वापर महाबोधी विहाराचा हिंदू मंदिर म्हणून उपयोग केला जाऊ लागला. त्यांनी केवळ मंदिर म्हणून उपयोग केला देखभाल केली नाही यामुळे या विहाराची आणखीनच पडझड झाली. एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश शासक जेव्हा भारतात शासन करत होते १८३६ मध्ये अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांनी महाबोधी महाविहाराचे उत्खनन केले यात महाबोधी महाविहाराचे अवशेष, सम्राट असोक कालीन स्तूप व पुरातन बांधकाम मिळून आले. १८८० मध्ये ब्रिटिश सरकारने या महाबोधी महाविहाराची दुरूस्तीचे काम सुरू केले पण यात महाविहाराच्या शिखरात काही बद्दल केले या दुरूस्ती कामात म्यानमार बौद्ध लोकांचे खूप मोठे योगदान आहे. श्रीलंकेमधील बौद्ध विद्वान अनागरिक धम्मपाल १८९१ महाबोधी महाविहाराच्या धम्म यात्रेवर होते. त्यांनी तेथे महाबोधी विहार हे शव पुजार्यांच्या हातात पाहून धक्काच बसला. बुध्दांची प्रतिमा हिंदू प्रतिमेत रुपांतरीत केली होती. बौध्दांना पुजा करण्यापासून रोखण्यात आले होते. परिणामी त्यांनी बोधगयेला बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी आंदोलन सुरू केले. हे साध्य करण्यासाठी अनागरिक धम्मपाल या पुजार्यांच्या विरुद्ध खटला सुरू केला. प्रदीर्घ संघर्षानंतर, भारतीय स्वातंत्र्यानंतर स्वतः अनागरिक धम्मपालांच्या मृत्यूनंतर १९४९ मध्ये महाबोधी महाविहाराचा हिंदू व बौद्धां कडे देण्यात आला. २००२ मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केले. परिसरातील सर्व धार्मिक कलाकृती १८७८ ट्रेझर ट्रॉव्ह कायदा अंतर्गत कायदेशीररीत्या संरक्षित आहे. यानंतर येथे जागतिक पर्यटक येऊ लागले बिहार सरकारने येथे स्वच्छतेसाठी ३३२ कोटी रुपये खर्च केले.
१) भारतातील सर्वात जुने बांधकाम, वास्तूकलेचा विकास
२) बुध्दांचे जीवना संबधीत व परंपराचा असाधारण प्रमाण
३) हि गुप्त काळा पेक्षाही जुने महत्त्वपूर्ण संरचना मधील एक आहे. या तीन मापदंडावर युनेस्कोने महाबोधी महाविहाराला जागतिक वारसा म्हणून घोषित केले.
२०१३ मध्ये बिहार सरकारने १९४९ कायद्यात सुधारणा केली. ज्यामुळे महाबोधी महाविहाराचा प्रमुखपदी बिगर हिंदूला परवानगी मिळाली. २०१३ मध्ये १००० बौद्धांनी निषेध नोंदविला. संपूर्ण विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे. अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष भंन्ते आनंद तसेच जपानी वंशाचे सुरी ससाई हे दोघेही तत्कालीन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रमुख नेते म्हणून प्रसिद्ध झाले. बोधगयेत बौद्धांचे सात पवित्र स्थान आहेत. येथे प्रमुख पिंपळाचे झाड म्हणजे बोधीवृक्ष या बोधीवृक्षाच्या सुरक्षेसाठी डेहराडून येथील वन अनुसंधान संस्थाचे ( FRI ) वैज्ञानिक देखभाल करतात. जातकाच्या मते पृथ्वीची नाभी याठिकाणी आहे. बुध्दांच्या ज्ञान प्राप्तीचे वजन इतर कोणतेही स्थान सहव करु शकत नाही. २०१३ मध्ये थायलंडचे राजा व तेथील उपासकांनी महाबोधी महाविहारला २८९ किलो सोने भेट म्हणून दिले आहे. पुरातत्व विभागाच्या मानतेने ते वरच्या भागावर म्हणजे शिखर २८९ किलो सोन्याने मढवण्यात आले आहे. सध्या संपूर्ण भारतात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे. आम्ही काय करतोय तर आमच्या गावात, तालुक्यात, जिल्हात, राज्यात निषेध नोंदवत आहोत, इथे निषेध नोंदवून काय होणार आहे. जिथे आपण जाऊन निषेध नोंदवायला हवा तिथेच नोंदवायला हवा. प्रत्येक गावातून ५ , प्रत्येक तालुक्यातून ५०, प्रत्येक जिल्ह्य़ातून ५०० असे उपासक बोधगया येथे किमान सात दिवस साखळी उपोषणात सहभागी असलेच पाहिजे. येथे गर्दी नको ज्यासाठी आम्ही उपोषण सुरू केले आहे ही गर्दी तेथेच असली पाहिजे. हि आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. आंबेडकर जयंती , भिमाकोरेगाव यासाठी जसा बौध्द मध्ये जोश असतो तोच जोश येथे असला पाहिजे. विदेशातून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे तसाच पाठिंबा आम्हाला येथे द्यावा लागेल. येत्या 29 जुलै ला सर्वोच्च न्यायालयात महाबोधी महाविहार संदर्भात निर्णय येण्याची शक्यता आहे.
संकलन - अजय पवार - 7620111313
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या