तिरंगा यात्रेच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर शहरातील वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन (Changes in traffic in Ballarpur city in the wake of the Tiranga Yatra, appeal to use alternative routes)
चंद्रपूर :- ज्या अर्थी बल्लारपुर शहरात मा. आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार बल्लारपुर विधानसभा क्षेत्र यांचे तर्फे दि. १८/०५/२०२५ रोजी 'ऑपरेशन सिंदुर' च्या माध्यमातुन भारतीय सैन्याने दाखवलेल्या अव्दितीय शौर्याला कृतज्ञतेने अभिवादन करण्यासाठी बल्लारपुर येथे भव्य तिरंगा यात्रेचे आयोजण करण्यात आलेले आहे. सदर तिरंगा यात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जन समुदाय उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्याकरीता शहरामध्ये वाहतुक समस्या निर्माण होवून रहदारीला अडथळा निर्माण होवू नये. तसेच जनतेस त्रास होवू नये, त्यांची गैरसोय होवू नये व अपघातासारखे प्रकार घडून जिवीत किंवा वित्तहानी होवु नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणुन या संदर्भात नव्याने उपायोजना करण्याचे आवश्यक झाले आहे. त्या अर्थी आम्ही सुदर्शन मुम्मका, पोलीस अधीक्षक बंद्रपुर महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ च्या कलम ३३(१) (ब) अन्वये आम्हांला प्राप्त कायदेशिर अधिकारान्वये जनतेला धोका, अडथळा किंवा गैरसोय होवु नये तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात होवु नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता दि. १८/०५/२०२५ चे सायंकाळी ०४:०० वा. पासुन ते रात्रौ १०:०० वा. पर्यंत बल्लारपुर शहरातील वाहतुक व्यवस्थेमध्ये पुढील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.
१) काटा गेट-गोल पुलीया गणपती वार्ड नविन बस स्टॅन्ड हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. तसेच सदरचे मार्ग हे नो पार्कीग व नो हॉकर्स झोन म्हणुन घोषीत करण्यात येत आहे. बल्लारपुर शहरात रॅली दरम्यान सर्व प्रकारचे अवजडवाहनाना पुर्णपणे बंद ठेवण्यात येत आहे. तरी अवजड वाहतुकदारांनी /इतर वाहनधारकांनी खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा.
१) बल्लारपुर मार्गे कोठारी गोंडपीपरी आष्टी जाणाऱ्या वाहनाकरीता चंद्रपुर ते जुनोना चौक जुनोना गाव -पोभुर्णा - गोंडपीपरी आष्टी हया मार्गाचा वापर करावा.
२) बल्लारपुर मार्गे राजुरा-गडचांदुर कोरपणा-तेलंगणा जागाऱ्या वाहनधारकांनी पडोली चौक धानोरा फाटा-भोयगाव-गडचांदूर या मार्गाचा वापर करतील तसेच चंद्रपुर करीता येणा-या वाहनांनी त्याव मार्गाचा वापर करावा. सदर अधिसूचना दि. १८/०५/२५ ये सायंकाळी ०४:०० वा. पासुन ते रात्रौ १०:०० वाजता पर्यंत अंमलात राहील. सदर अधिसुचनेच्या कालावधीत शक्यतो नागरीकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बल्लारपुर शहरात येण्याचे टाळावे. तरी वरिल निर्देशांचे पालन करुन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या