१०० दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये बल्लारपूर पोलीस स्टेशन ला जिल्ह्यात प्रथम तर नागपूर विभागात तिसरा पुरस्कार जाहीर (Ballarpur Police Station was awarded first in the district and third in the division in the 100-day action plan for public awareness in administration.)
बल्लारपूर :- प्रशासनात लोकाभिमुखता आणणारा १०० दिवस या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. शंभर दिवसात सर्व विभागांनी चांगले काम केले आहे. १०० दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये, शासकीय कार्यालयांचे संकेतस्थळ अद्ययावत करणे, ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करणे, शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबविणे, नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढणे, कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणे याचा समावेश आहे. नागरिकांसोबत संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी निकाली काढाव्यात. शासकीय कार्यालयात येणा-या नागरिकांचे समाधान होईल, अशी वर्तणूक त्यांना देणे आवश्यक होते. या सर्व बाबींचा समावेश होता.
बल्लारपूर पोलीस स्टेशन द्वारे बॅनर लावून हक्क, सोय याचे जनजागृती केले. तसेच पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात नवीन कायदा, पोस्को, सायबर गुन्हे याबाबत जनजागृती करण्यात आले. तसेच पोलीस स्टेशन येथे प्रत्येक विभागाला नेम प्लेट लावले होते. अत्याधुनिक रेकॉर्ड रूम,पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच रोज साफ सफाई, बगीचा, सुभोशित झाडे, रोज पायदळ पेट्रोलिंग, रोज रात्री पेट्रोलिंग, दर शुक्रवारी ला तक्रार निवारण करण्यासाठी बैठक यासोबत बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे १०० दिवसात ३६९ पासपोर्ट, २५ चरित्र सत्यपण, १०० दिवसात ३७५ तक्रारी आले होते त्याचे पूर्णपणे निवारण केले, ९२३ गुन्हे होते त्यात ६१९ गुन्ह्याची उकल केले. या सर्व बाबींचा विचार करून बल्लारपूर पोलीस स्टेशन ला चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम पुरस्कार देण्यात आले ते नागपूर विभागात तिसरा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांचा मार्गदर्शनाखाली बल्लारपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्याम गव्हाणे यांनी १०० दिवसात विशेष कामगिरी केले. पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या