बल्लारपूर :- बल्लारपूर स्पोर्ट्स बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर द्वारा आयोजित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूरच्या पटांगणावर मोफत वॉलीबॉल समर कॅम्पचे आयोजन दिनांक 1 मे ते 17 मे 2025 दरम्यान आयोजन करण्यात आले. या समर कॅम्प मध्ये व्हॉलीबॉल चे प्रशिक्षण देण्यात आले. खेळाडू पियुष शहा ,कृष्णा यादव, राजवी बांबोळे, श्लोक तिवारी व राष्ट्रीय स्तरावर मैदानी स्पर्धेत निवड झालेला आरुष चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हॉलीबॉल कोचिंग च्या व्यतिरिक्त संजय कुबडे यांनी कराटेचे प्रशिक्षण दिले. या समर कॅम्प मध्ये एकूण 36 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिंह चंदेल, प्रमुख अतिथी काँग्रेसचे ज्येष्ठ नेता घनश्याम मूलचंदानी आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, ट्रान्सपोर्टर नाना बुंदेल, लोकमतचे पत्रकार वसंतराव खेडेकर उपस्थित होते. बल्लारपूर स्पोर्ट्स बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व चंद्रपूर जिल्हा वालीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद आवते यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये सर्व खेळाडूंनी नियमित हॉलीबॉल खेळणे सुरू ठेवावे आणि समर कॅम्प संपला तरीही आमची कोचिंग सुरूच राहील असे सांगितले .उपाध्यक्ष काशी सिंग यांनी नगरपरिषद तर्फे व्हॉलीबॉल ग्राउंड तयार झाल्याचे सांगितले. संचालन संजय झाडे यांनी केले.
वरिष्ठ खेळाडू प्राध्यापक विजय कुलकर्णी , प्राध्यापक महेंद्र बोंगाडे, प्राध्यापक युवराज बोबडे, श्रीनिवास उन्नाव, सुरेश गोडे, चंद्रकांत मैदमवार, रवी अन्सुरी, शांताराम वाडगुरे, भुपेश पराते, शुभम पराते, प्रफुल नांदेकर उपस्थित होते. मंथन कुकडकर प्रफुल नांदेकर राहुल चणेकर प्रज्वल येलमुले यश राऊत व प्रज्वल आवते यांनी समर कॅम्प यशस्वी करण्याकरिता महत्वपूर्ण कार्य केले. शैलेश कार्लेकर या पालकानी आपल्या मुलाबद्दल सांगितले की वोलीबॉल प्रशिक्षण चांगले आहे. अध्यक्ष भाषण मध्ये चंदनसिंग चंदेल यांनी आपले हॉलीबॉल चे प्रशिक्षण नियमित चालू ठेवावे असे सांगितले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या