बल्लारपूर :- चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ता तथा लेखक पवन भगत यांची "ते पन्नास दिवस" ही कादंबरी मुंबई विद्यापीठात एम ए. अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली. या पूर्वी त्यांची कादंबरी अहमदनगर अभिमत विद्यापीठात अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. पवन भगत हे अतिशय अभ्यासपूर्ण लेखन करतात. त्यांची लेखन शैली मराठी साहित्यात नवं कृती निर्माण करणारी आहे. अनेक जेष्ठ समीक्षकांनी त्यांच्यावर भरभरून लिहले आहे. परंपरा गत साहित्य हे चौकट बंद साहित्य आहे या संकल्पनेला तोडण्याचे काम पवन भगत यांनी केले. त्यांची कादंबरी, लेखन ही मानवी मनाचा ठाव घेत असते. ते पन्नास दिवस या कादंबरी चे कथानक ही कादंबरी लॉकडाऊन च्या काळातील स्थानान्तरीत, विस्थापित, हाकलून लावलेल्या मजुरांच्या जीवघेण्या पायदळ प्रवासा वर आधारित असून. कामगार भारताच्या आर्थिक राजधानी ते सांस्कृतिक राजधानी काशी, वाराणसी पर्यंत चा एकूण एक हजार पाचशे किलोमीटर चा प्रवास अधोरेखित करते. हाताला काम नाही. राहायला घर नाही. खायला अन्न नाही अश्या. हुसकावून लावलेल्या समूह गटाचा प्रवास अधोरेखित करतांना. सोबत स्त्रिया, गर्भवती स्त्रिया, लहान मुले, आजारी माणसं, वृद्ध मंडळी यांचा एक समूह गट निर्माण होऊन तो आपल्या राहत्या गावाकडे असाहाय्य होऊन निघतो. तो समूह गट एक प्रकारे बहिषकृत असून त्यांचे सामाजिक, राजनैतिक, आर्थिक, इतर अधिकार निलंबित असल्याने. ते या देशाचे निलंबित नागरिक म्हणून त्यांचे जगणे हेठो सारखेच असते. म्हणून ती कथा वयक्तिक नसून सामूहिक वेदनेचे प्रतिनिधित्व करणारी कथा आहे. या कथेतील प्रत्येक पात्र एक संघर्ष कथा सांगत सुटते. केवळ उपाशी पोटी चालतच नाही तर आपल्या सांस्कृतिक, बोली भाषा, परंपरा, भोगोलिक, पर्यावरण, जल, जंगल, जमीन चे महत्व सांगत पुढे जाते.. आदिवासी च्या उपचारांची पद्धत, कोणती वनस्पती किती उपयोगी आहे.. जंगल हे मानवी जीवनासाठी किती पूरक उपयोगी आहे. ते तारणारे आहे मारणारे नाही. त्याचे जतन करणे काळाची गरज आहे. शासन, प्रशासन, राजकीय सत्ता, यांच्या कार्य प्रणालीवर बोटं ठेऊन. आलेल्या संकटाशी सामना न करता. आपदा मे लूट... अश्या प्रकारे झालेल्या लुटी चं वर्णन करत ती पुढे जाते यातील प्रत्येक पात्र हा संघर्ष कथा सांगत जाते. वर्ग, जात, वर्ण, धर्म. ह्या संकल्पना किती बोथट असतात. ज्याला पोट आहे त्याला भूख असते. म्हणून भुकेचं नातं हे फक्त भाकरीशी आहे. म्हणून पवन भगत यांची कादंबरी वेदनेची कादंबरी आहे.
मानवी संघर्षाची आणि त्यातून मानवतेचा हाथ धरून पुढे चालण्याचा आग्रह करते. शेवटी ही कादंबरी एक जीवघेन्या प्रवासाला प्रेरणादायी करून देते. विभिन्न विचारांची, जाती ची, धर्माची माणसं एकमेकांना सांभाळून प्रवास करतांना दिसतात. हाच मानवतेचा संदेश ही कादंबरी देते. अश्या लेखकांची कादंबरी मुंबई विद्यापीठात एम. ए सेकंड ला समाविष्ट केल्याने त्यांचे अभिनंदन. खासदार प्रतिभा ताई धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार तसेच केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, अशोक निमंगडे, लोकनाथ यशवंत, नरेंद्र सोनारकर यांनी अभिनंदन केले. प्रगतीशील लेखक संघाच्या वतीने ही त्यांचे अभिनंदन करण्यात आले प्रगतशील लेखक संघांचे जिल्हा सचिव सुब्रोत दत्ता, प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन चे ऍड योगिता रायपूरे, मृणाल कांबळे.,.डा विजय कळसकर, नागेश रत्नपारखी, प्रशांत बोराडे इत्यादी नी अभिनंदन केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या