बल्लारपूर :- कधीकाळी सामाजिक , शैक्षणिक, राजकीय कुप्रथांवर हल्लाबोल करत आपल्या पथनाट्याने ज्वलंत समस्या अधोरेखित करणाऱ्या एकता नाट्य मंचाने तब्बल २५ वर्षा नंतर नाट्यक्षेत्रात नव्याने पाऊल टाकले आहे. एकता नाट्य मंच चे संयोजक पवन भगत यांनी 'कबीरा खडा बजार मे' या तीन अंकी नाटकासाठी पुढाकार घेतला असून, त्यांनी कोरोना काळातील लॉक डाऊन मद्ये हजारो किमी प्रवास करणाऱ्या मजुरांचा आक्रोशीत टाहो 'ते पन्नास दिवस' या कादंबरीतून मांडला आहे. विशेष म्हणजे ही कादंबरी मुंबई विठयापीठाच्या अभ्यासक्रमाला लागली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात एकता नाट्य मंच ने कधीकाळी विदर्भ, मराठवाडा, मुबंई अशा ठिकाणी पथनाट्यातून समाज प्रबोधन केले होते. पवन भगत त्यांच्याच नियोजन आणी नेतृत्वात बल्लारपूर शहरात भरगच्च असे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. दरम्यान कलावंतांच्या परिवारिक जबाबदाऱ्या, तत्कालीन आर्थिक परिस्थिती यामुळं ऐकता नाट्य मंच चे काम हळू हळू मंदावले. आणी तब्बल २५ वर्ष या सांकृतिक आंदोलनाला स्थिर व्हावे लागले. काळ बदलला पण समस्या अजूनही कायम आहेत. जाती पाती चे भूत अध्यापही समाजाच्या माणगुटीवर बसूण आहे. हिंदू-मुस्लिम अराजकता माजवून राजकारण खेळल्या जात आहे. त्यामुळे संत कबीरांचे तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक संघर्ष अजूनही प्रासंगिक आहे. हाच धागा पकडून एकता नाट्य मंच द्वारा जुने, नवे कलावंत घेऊन कबीरा खडा बाजार मे या तीन अंकी नाटकाचा हिंदी भाषेत प्रयोग लवकरच रंग भूमीवर साकारणार आहे. ज्ञान सागर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु असलेल्या संत कबीराला रंगमंचावर साकारले जाणार आहे. प्रसिद्ध लेखक भीष्म सहानी लिखित या तीन अंकी नाटकाचा पहिला प्रयोग कबीर जयंती च्या पर्वावर आयोजण्याचा कलावंतांचा माणस असून सर्व कलावंत आपापला वेळ काढून या नाटकाच्या तयारीला लागले आहेत. यासाठी सागर धाबर्डे, किशोर जामदार डॉ. भावना पवन भगत यांच्या मार्गदर्शनात पवन भगत, भगत, डॉ. विनय कवाडे, नरेंद्र सोनारकर, आशु वनकर, राकेश कांबळे, भीमा पाटील, संगीता शेंडे, संघपाल मुंडे, स्वप्नाली लभाने, नागार्जुन लिहितकर इत्यादी कलावंत सराव करित आहेत.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या