वेकोलीच्या उप व्यवस्थापकाच्या घरी धाडसी चोरी, जवळपास 9 तोळे सोने, मोबाईल फोन व लाखोचा मुद्देमाल चोरीला गेल्यांची सूत्रांची माहिती (Sources report that a daring robbery took place at the house of the deputy manager of Vekoli, nearly 9 tolas of gold, mobile phones and valuables worth lakhs were stolen.)

Vidyanshnewslive
By -
0
वेकोलीच्या उप व्यवस्थापकाच्या घरी धाडसी चोरी, जवळपास 9 तोळे सोने, मोबाईल फोन व लाखोचा मुद्देमाल चोरीला गेल्यांची सूत्रांची माहिती (Sources report that a daring robbery took place at the house of the deputy manager of Vekoli, nearly 9 tolas of gold, mobile phones and valuables worth lakhs were stolen.)


बल्लारपूर :- येथील वेकोली वसाहत मध्ये वेकोलीच्या उप व्यवस्थापकाच्या घरी चोरांनी दरोडा घातला असून चाकूचा धाक दाखवून सोने, मोबाईल, नगदी रुपये चोरून नेल्याची घटना आज रात्री 4:15 वाजताच्या सुमारास घडली. यावेळी दरोडेखोरांनी हातात धारदार शस्त्रे दाखवत जीवे मारण्याची धमकी देत ​​9 तोळे सोने, मोबाईल फोन, मालमत्तेच्या कागदपत्रांनी भरलेली काळी बॅग आणि आठ हजार रुपये रोख घेऊन पळ काढला. सूत्रांच्या माहितीनुसार आज रात्री 4:15 वाजताच्या सुमारास उप व्यवस्थापक स्वामी हरला बानोत रा. वेकोली वसाहत क्वार्टर नं. बी ४ यांचा क्वार्टर मध्ये तीन मुखवटाधारी काळे कपडे परिधान केलेले अज्ञात दरोडेखोरांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूमची ग्रील तोडून घरात प्रवेश केला. स्वामी बानोत यांच्या पत्नी ज्योती बनोट व दोन लहान मुले घरात राहत होती. चोरांनी एका १४ महिन्यांच्या मुलीच्या कानातून बळजबरीने कानातले बारी काढले. चोरांनी लाईट न लावता मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात दरोडा टाकला, गळ्यावर चाकू ठेवून दरोडा टाकला. यांचा पाठलाग होऊ नये, निघताना त्यांनी कारच्या चाव्याही घेऊन पळाले. बल्लारपूरमध्ये चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. विसापूर, भगतसिंग वॉर्ड, बीटीएस प्लॉट आणि आता वेकोलि अधिकारी यांच्या घरात चोरीच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत बल्लारपूर पोलिसांना एकाही आरोपीला अटक करण्यात यश आले नाही. नुकतेच बल्लारपूर पोलीस स्टेशन ला उत्कृष्ठ पोलीस स्टेशन म्हणून प्रथम पुरस्कार पोलीस अधीक्षकांनी दिले होते. सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी आपल्या ताफ्यासह भेट दिली. प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे यांनी केले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत भोयर करीत आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)