मुंबईतील दांपत्याने निर्माण केला देशप्रेमाचा नवा आदर्श, विदेशवारी रद्द करुन शहिदाच्या कुटुंबीयाला केली मदत (A couple from Mumbai created a new ideal of patriotism, helped the family of a martyr by canceling their foreign trip)

Vidyanshnewslive
By -
0
मुंबईतील दांपत्याने निर्माण केला देशप्रेमाचा नवा आदर्श, विदेशवारी रद्द करुन शहिदाच्या कुटुंबीयाला केली मदत (A couple from Mumbai created a new ideal of patriotism, helped the family of a martyr by canceling their foreign trip)


वृत्तसेवा :- पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला असून, सीमारेषेवर चकमकी, गोळीबार आणि दोन्ही देशांच्या लष्करी कारवायांना वेग आला आहे. 7 मे रोजी भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे 9 अड्डे नेस्तनाबूत केल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. यानंतर उरी सेक्टर, पूँछ, आणि एलओसीवर चकमकी वाढल्या. या संघर्षात, मुंबईच्या घाटकोपरमधील मुरली नाईक हे जवान पाकिस्तानशी लढताना वीरमरण आले. मजूर बापाचा मुलगा मुरली देशासाठी शहीद झाला, ही बातमी माध्यमांतून समोर आल्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतातील पर्यटकांनी आपली नियोजित पर्यटनयात्रा रद्द केली. यामुळे देशात युद्धजन्य परिस्थितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील एका जोडप्याने अनोखी आणि प्रेरणादायी कृती केली आहे. गेले अनेक महिने परदेशवारीची तयारी करत असलेल्या या जोडप्याने, देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या बलिदानाचा आदर म्हणून आपली फॉरेन ट्रीप रद्द केली आहे. त्यांनी पिकनिकसाठीची रक्कम, तब्बल ₹1,09,001, शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी दिली आहे. देशभरातून त्या जोडप्याच्या निर्णयाचे कौतुक होत आहे. "जेव्हा देशाचे जवान सीमारेषेवर जीवाची बाजी लावत आहेत, तेव्हा आपल्याला मजा करण्याचा नैतिक अधिकार नाही," असे म्हणत त्यांनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली आहे. उरी सेक्टरमध्ये सुरू असलेल्या संघर्षात शहीद झालेले मुरली नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशातील असले तरी, त्यांचे कुटुंब मुंबईच्या घाटकोपरमधील कामराज नगर परिसरात राहत होते. त्यांचे वडील मजूर असून, संपूर्ण कुटुंब सामान्य जीवन जगत होते. नुकतीच मुरली यांची आई-वडील गावच्या जत्रेसाठी आंध्र प्रदेशात गेले होते. तिथेच त्यांना मुरली शहीद झाल्याची बातमी मिळाली. या बातमीनंतर गावात आणि मुंबईत दुःखाची लाट उसळली. आईच्या आक्रोशाने उपस्थितांचे मन हेलावून टाकले. मात्र, त्यांचे वडील अत्यंत धीराने म्हणाले, "माझा मुलगा देशासाठी शहीद झाला... या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे."

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)