श्रेया इथापेची खेलो इंडिया युथ गेम 2025 करिता निवड (Shreya Ithape selected for Khelo India Youth Games 2025)

Vidyanshnewslive
By -
0
श्रेया इथापेची खेलो इंडिया युथ गेम 2025 करिता निवड (Shreya Ithape selected for Khelo India Youth Games 2025)


चंद्रपूर :- केंद्र शासनाच्या खेलो इंडिया अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे मैदानी खेळ प्रशिक्षण केंद्रात जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी मार्फत निवड करून तज्ज्ञ प्रशिक्षकामार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण केंद्रातील श्रेया नितीन इथापे या खेळाडूची खेलो इंडिया युथ गेम सन 2025 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरिता 100 मी. हल्डर्स या क्रीडा प्रकारासाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा दि. 12 ते 14 मे 2025 या कालावधीत पटना (बिहार) येथे होणार आहे. या स्पर्धेकरीता श्रेयाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, खेलो इंडिया प्रशिक्षक रोशन भुजाडे व इतर क्रीडाप्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेयाने राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत सलग 3 वेळा प्राविण्य व 20 वी नॅशनल अथलेटिक्स युथ गेम सन 2024-25 मध्ये 100 मी. हर्डल्स क्रीडा प्रकारामध्ये नेत्रदिपक कामगिरी करून रौप्य पदक प्राप्त केले होते.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)