बहुजन समता पर्वाच्या माध्यमातून 11 मे रोजी महात्मा ज्योतीबा फुले चित्रपटाचा निशुल्क शो (Free screening of Mahatma Jyotiba Phule film on 11th May through Bahujan Samata Parva)

Vidyanshnewslive
By -
0
बहुजन समता पर्वाच्या माध्यमातून 11 मे रोजी महात्मा ज्योतीबा फुले चित्रपटाचा निशुल्क शो (Free screening of Mahatma Jyotiba Phule film on 11th May through Bahujan Samata Parva)
चंद्रपूर :- बहुजन समता पर्व चे डॉ. दिलीप कांबळे व त्यांच्या टिम च्या माध्यमातून महात्मा ज्योतीबा फुले चित्रपटाचा निशुल्क शो 11 मे रोजी सायंकाळी 5 ते 9 च्या दरम्यान सपना टॉकीज मध्ये नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती डॉ. दिलीप कांबळे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट विरोधी पक्ष नेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून मोफत दाखविण्यात येणार आहे. या एका शो मध्ये 900 सीटांची व्यवस्था राहणार आहे. पत्रपरीषदेला डॉ. दिलीप कांबळे, एड. वैशाली टोंगे, एड. मनोज कवाडे, प्रा. कोमल खोब्रागडे, विनोद लभाने आदी उपस्थित होते. या माध्यमातून महात्मा ज्योतीबा फुले यांनी बहुजन समाजाच्या कल्याणासाठी केलेले कार्य, सर्वांना समान शिक्षण देण्यासाठी केलेला संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्यासाठी या उपक्रमाचे आयेाजन केले आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. दिलीप कांबळे यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)