अवैध सुगंधित तंबाखू ची तस्करी करतांना ८२ हजार रुपयांचा मुद्देमालासह एका व्यक्तीला अटक (A person was arrested while smuggling illegal flavored tobacco with goods worth Rs. 82 thousand.)
बल्लारपूर :- बल्लारपूर शहरातून अवैध सुगंधित तंबाखू ची वाहतूक करणाऱ्या एका युवकाला बल्लारपूर पोलीसांनी ताब्यात घेत सुझुकी मोपेड सह ८२ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. या प्रकरणी समीर यासिर बेग (२५) रा. मस्जिद वॉर्ड, गांधी चौक राजुरा जि. चंद्रपूर याच्यावर गुन्हा नोंदविला आहे. सदर कारवाई ३१ मार्च रोजी रात्री ९.४५ वाजता रेल्वे चौक येथे करण्यात आली. या माहितीचे आधारे पोलीसांनी रेल्वे चौक येथे सापळा रचत समीर यासीर बेग (२५) रा. मस्जिद वॉर्ड, गांधी चौक राजुरा जि. चंद्रपूर याला ताब्यात घेत पांढऱ्या रंगाचा चुंगडी मधील सुगंधित तंबाखू किंमत २२ हजार ७१५ रुपये, सुझुकी मोपेड क्रं.एमएच ३३ एएफ ६२७६ किंमत ६० हजार रुपये असा एकूण ८२ हजार ७१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. ३१ मार्च रोजी बल्लारपूर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथक रात्री ९.४० वाजता अवैध दारू, गांजा व सुगंधित तंबाखू बाबत कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम सुझुकी मोपेड वाहनाने सुगंधित तंबाखू ची वाहतूक करीत आहे. आरोपी समीर यासीर बेग याचा विरुध्द कलम २२३, २७५ बीएनएस तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ मधील कलम २६(२)(i), २६(२)(iv), ३०(२)(अ), ४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या