चंद्रपूर :- भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिले निवेदन सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून तापमानाने ४५ ते ४६ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे. जागतिक पातळीवर चंद्रपूर शहराची नोंद चौथ्या क्रमांकाच्या सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये झाली असून भारतात सर्वाधिक तापमान असलेले शहर म्हणूनही चंद्रपूरचे नाव पुढे आले आहे.या पार्श्वभूमीवर शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळांना किमान पाच दिवसांची तात्पुरती सुट्टी जाहीर करण्यात यावी किंवा शाळांच्या वेळापत्रकात तातडीने बदल करण्यात यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदनाद्वारे केली आहे. आ. जोरगेवार यांच्या सुचनेनुसार भारतीय जनता पार्टीच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन सदर मागणीचे लिखित निवेदन सादर केले. यावेळी भाजपच्या माजी नगरसेविका छबू वैरागडे, शीतल आश्राम, मंजुश्री कासनगोट्टूवार, यश बांगडे, योगिता धनेवार, राशिद हुसेन, नकुल वासमवार, यश ठाकरे, मनीष पिपरे, वंश थोरात, आकाश पडगेलवार, बबन धनेवार, कार्तिक बोरवार, संजय महाकालीवार आदी उपस्थित होते. चंद्रपूरातील वाढते तापमान आणि उष्णतेची तीव्रता लक्षात घेता उष्णाघात, डिहायड्रेशन, अशक्तपणा, चक्कर येणे यांसारख्या समस्या विद्यार्थ्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः सकाळी व दुपारी शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या मागणीला पालक, शिक्षक आणि सामाजिक संस्थांकडूनही मोठा पाठिंबा मिळत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या