बुध्द पौर्णिमेच्या पर्वावर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात होणार प्राणी गणना,२८ एप्रिल ते ५ मे पर्यंत ऑनलाईन बुकिंग करण्याचं आवाहन (Animal census to be held in Tadoba-Andhari Tiger Reserve on the occasion of Buddha Purnima, appeal for online booking from April 28 to May 5)
चंद्रपूर :- वाघ, बिबट्या व इतर वन्यजींवाच्या हमखास दर्शनासाठी जग प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत १२ मे २०२५ ला बफर क्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला निसर्गानुभव उपक्रम निसर्ग प्रेमीसाठी राबविण्यात येणार आहे. सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रती व्यक्ती ४५०० रुपये इतके शुल्क आकरण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या पर्यटकांनी संकेतस्थळामार्फत १५०० रुपये अदा करून भरलेल्या रकमेची पावती सबंधित पर्यटन गेटला दाखवावी. उर्वरित रकमेमध्ये जिप्सी शुल्क २००० रुपये पर्यटन गेट ते मचाण प्रवास खर्च व मार्गदर्शक शुल्क १००० रुपये इतके सबंधित पर्यटन गेटवर रोख स्वरूपात देण्यात यावे. या उपक्रमासाठी बफर क्षेत्रातील चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव व शिवणी या सहा वनपरिक्षेत्रातील ५० मचाणी सज्ज करण्यात आलेल्या आहेत. निसर्ग प्रेमींकरिता ताडोबातील वन्यजीवन मचाणीवर बसून अनुभवण्याची ही सुवर्ण संधी आहे. या प्राणीगणनेमध्ये सहभागी होण्यासाठी २८ एप्रिल ते ५ मे २०२५ या कालावधीत https://mytadoba.mahaforest.gov.in/ या संकेत स्थळावर बुकिंग सुरु होणार असून एकूण १०० निसर्गप्रेमी यामार्फत बुकिंग करू शकतात. सहभागी होणाऱ्या निसर्गप्रेमींनी शाकाहारी जेवणाची व पाण्याची व्यवस्था स्वतः करावी तसेच कॅमेरा व सर्चलाईटला सदर उपक्रमामध्ये परवानगी नाही. इतर माहितीकरिता वरील संकेत स्थळावर भेट देण्यात यावी. सदर उपक्रमाविषयी काही अडचणी असल्यास कार्यालयीन वेळेस सुमित कोहळे, 8421461698 (सहाय्यक पर्यटक व्यवस्थापक, उपसंचालक बफर कार्यालय, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आनंद रेड्डी, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांनी केले आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या